S M L

विरोधकांचा गोंधळ सत्ताधार्‍यांच्या कुरघोडी राजकारणातून ?

22 मार्चअर्थमंत्री अजित पवार बजेट मांडत असताना विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. पण हा विरोधकांचा गोंधळ सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील कुरघोडीच्या राजकारणातून निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.गोरगरीब निराधार लोकांना मदतीचा हात देणारी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना. पण या योजनेवर सत्ताधारी पक्षांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लागते त्यामुळे या योजनेच्या तालुकाध्यक्ष पदावर स्थानिक आमदारांची वर्णी लावावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अध्यक्षांच्या बैठकीतही तोडगा निघाला नाही तेव्हा विरोधकांनी अर्थमंत्र्यांच्या बजेटमध्येच गोंधळ घातला. पण हा विरोधकांचा गोंधळ म्हणजे नियोजित डाव होता असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला. विरोधकांचा गोंधळ हा काँग्रेसच्या इशार्‍यांवरून झाला असंही राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बोलण्यातून नकळत स्पष्ट झालंय. आधी गृहमंत्री आर आर पाटील आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोधकांनी टार्गेट केलंय. त्यावरून विरोधक नेमकं कोणाच्या इशार्‍यावरून गोंधळ घालतायत याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यातूनच या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संशयाचे वातावरण तयार झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 05:08 PM IST

विरोधकांचा गोंधळ सत्ताधार्‍यांच्या कुरघोडी राजकारणातून ?

22 मार्च

अर्थमंत्री अजित पवार बजेट मांडत असताना विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. पण हा विरोधकांचा गोंधळ सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील कुरघोडीच्या राजकारणातून निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.

गोरगरीब निराधार लोकांना मदतीचा हात देणारी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना. पण या योजनेवर सत्ताधारी पक्षांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लागते त्यामुळे या योजनेच्या तालुकाध्यक्ष पदावर स्थानिक आमदारांची वर्णी लावावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अध्यक्षांच्या बैठकीतही तोडगा निघाला नाही तेव्हा विरोधकांनी अर्थमंत्र्यांच्या बजेटमध्येच गोंधळ घातला.

पण हा विरोधकांचा गोंधळ म्हणजे नियोजित डाव होता असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला. विरोधकांचा गोंधळ हा काँग्रेसच्या इशार्‍यांवरून झाला असंही राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बोलण्यातून नकळत स्पष्ट झालंय. आधी गृहमंत्री आर आर पाटील आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोधकांनी टार्गेट केलंय. त्यावरून विरोधक नेमकं कोणाच्या इशार्‍यावरून गोंधळ घालतायत याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यातूनच या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संशयाचे वातावरण तयार झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close