S M L

भारतासमोर 261 रन्सचं टार्गेट

24 मार्चवर्ल्ड कपच्या क्वार्टरफायनलमध्ये दुसरी लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अहदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ही मॅच खेळवली जातेय. आणि ऑस्ट्रेलिया टॉस जिंकत पहिल्या बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने भारताला 261 रन्सचं आव्हान दिलं आहे.ऑस्ट्रेलियाने सुरूवात सावधपणे केली मात्र आर अश्विननं वॉट्सनला आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. पण यानंतर हॅडिन आणि पॉण्टिंगने इनिंग सावरली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 70 रन्सची पार्टनरशिप केली. हॅडिनने हाफसेंच्युरी ठोकली. पण यानंतर लगेचच युवराजने त्याला आऊट केलं. मायकल क्लार्क युवराजची दुसरी विकेट ठरली. क्लार्क आठ रन्स काढून आऊट झाला. तर झहीर खानने माईक हसीला बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. तर व्हाईटच्या पाच बळी घेण्यात ही भारतीय गोलंदाजाना यश प्राप्त झालं आहे. दरम्यान कॅप्टन पॉण्टिंगने शतकी खेळीकरत वन-डेमधील आपली 79 वी हाफ सेंच्युरी ठोकली. आणि या वर्ल्ड कपमधील ही त्याने आत्तापर्यंतचा आपला हायएस्ट स्कोअरही केला. मात्र त्याचा हा आनंद आर अश्विनने मोडीत काढला आणि 104 रन्सवर त्याला तंबूत पाठवले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 01:02 PM IST

भारतासमोर 261 रन्सचं टार्गेट

24 मार्च

वर्ल्ड कपच्या क्वार्टरफायनलमध्ये दुसरी लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अहदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ही मॅच खेळवली जातेय. आणि ऑस्ट्रेलिया टॉस जिंकत पहिल्या बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने भारताला 261 रन्सचं आव्हान दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाने सुरूवात सावधपणे केली मात्र आर अश्विननं वॉट्सनला आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. पण यानंतर हॅडिन आणि पॉण्टिंगने इनिंग सावरली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 70 रन्सची पार्टनरशिप केली. हॅडिनने हाफसेंच्युरी ठोकली. पण यानंतर लगेचच युवराजने त्याला आऊट केलं. मायकल क्लार्क युवराजची दुसरी विकेट ठरली. क्लार्क आठ रन्स काढून आऊट झाला. तर झहीर खानने माईक हसीला बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. तर व्हाईटच्या पाच बळी घेण्यात ही भारतीय गोलंदाजाना यश प्राप्त झालं आहे. दरम्यान कॅप्टन पॉण्टिंगने शतकी खेळीकरत वन-डेमधील आपली 79 वी हाफ सेंच्युरी ठोकली. आणि या वर्ल्ड कपमधील ही त्याने आत्तापर्यंतचा आपला हायएस्ट स्कोअरही केला. मात्र त्याचा हा आनंद आर अश्विनने मोडीत काढला आणि 104 रन्सवर त्याला तंबूत पाठवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close