S M L

हिवरेबाजारमध्ये स्मिता ठाकरेंच्या जमिनीवरून वाद होण्याची शक्यता

24 मार्चराजकीय नेते आणि कलाकार यांच्या जमिनीचा वाद अहमदनगर जिल्ह्याला नवा नाही. आदर्श गाव असलेल्या हिवरेबाजारमध्ये असलेल्या स्मिता ठाकरेंच्या जमिनीवरून आता वाद होण्याची शक्यता आहे. हिवरेबाजारच्या शिवरात स्मिता ठाकरे यांची 27 एकर जमीन आहे. काही वर्तमानपत्रात या जमिनीच्या विक्रीची जाहिरात आली आणि वाद निर्माण झाला. आपल्या गावातली जमीन दुसर्‍यांना विकायची नाही असा हिवरेबाजार ग्रामसभेचा निर्णय आहे. जमीन दुसर्‍याला विकली तर गावाच्या विकासात अडथळा येवू शकतो इथल्या गावकर्‍यांचं मत आहे. त्यामुळे या जमिनीचा सामाजिक उपक्रमासाठी उपयोग करावा असा आग्रह आम्ही स्मिता ठाकरेंकडे धरणार असल्याची माहिती हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 02:25 PM IST

हिवरेबाजारमध्ये स्मिता ठाकरेंच्या जमिनीवरून वाद होण्याची शक्यता

24 मार्च

राजकीय नेते आणि कलाकार यांच्या जमिनीचा वाद अहमदनगर जिल्ह्याला नवा नाही. आदर्श गाव असलेल्या हिवरेबाजारमध्ये असलेल्या स्मिता ठाकरेंच्या जमिनीवरून आता वाद होण्याची शक्यता आहे. हिवरेबाजारच्या शिवरात स्मिता ठाकरे यांची 27 एकर जमीन आहे. काही वर्तमानपत्रात या जमिनीच्या विक्रीची जाहिरात आली आणि वाद निर्माण झाला.

आपल्या गावातली जमीन दुसर्‍यांना विकायची नाही असा हिवरेबाजार ग्रामसभेचा निर्णय आहे. जमीन दुसर्‍याला विकली तर गावाच्या विकासात अडथळा येवू शकतो इथल्या गावकर्‍यांचं मत आहे. त्यामुळे या जमिनीचा सामाजिक उपक्रमासाठी उपयोग करावा असा आग्रह आम्ही स्मिता ठाकरेंकडे धरणार असल्याची माहिती हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 02:25 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close