S M L

बिल्डर सानिया काद्रीच्या परवानगी नसलेले बांधकाम पाडले

24 मार्चबिल्डर सानिया काद्रीच्या परवानगी नसलेल्या घरांचे बांधकाम भुसावळ नगरपालिकेने आज पाडले. पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी आणि बिल्डर सानिया काद्री या दोघांमधील वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खडका रोड भागातील राधाकुंज सोसायटीतील पाचही बंगले अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. 18 पोलीस अधिकारी, 150 होमगार्ड्स आणि 120 पोलीस कर्मचारी एवढ्या प्रचंड बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कायद्यानुसार रितसर नोटीस दिल्यामुळे हे बांधकाम पाडले जाणार हे निश्चित होते. याविरूद्ध सानिया काद्रीने कोर्टापुढे स्थगितीचीही परवानगी मागितली होती. पण ते न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 03:24 PM IST

बिल्डर सानिया काद्रीच्या परवानगी नसलेले बांधकाम पाडले

24 मार्च

बिल्डर सानिया काद्रीच्या परवानगी नसलेल्या घरांचे बांधकाम भुसावळ नगरपालिकेने आज पाडले. पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी आणि बिल्डर सानिया काद्री या दोघांमधील वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खडका रोड भागातील राधाकुंज सोसायटीतील पाचही बंगले अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. 18 पोलीस अधिकारी, 150 होमगार्ड्स आणि 120 पोलीस कर्मचारी एवढ्या प्रचंड बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कायद्यानुसार रितसर नोटीस दिल्यामुळे हे बांधकाम पाडले जाणार हे निश्चित होते. याविरूद्ध सानिया काद्रीने कोर्टापुढे स्थगितीचीही परवानगी मागितली होती. पण ते न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close