S M L

कांगारूंचा गेम ओव्हर, आता पाकिस्तानची बारी

24 मार्चवर्ल्ड कप स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या पराभवामुळे तब्बल 12 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपमधील मक्तेदारी संपली आहे. भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो पुन्हा एकदा ऑलराऊंडर युवराज सिंग. युवराजने 57 रन्स करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी भारतासमोर 261 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवागन 15 रन्स करुन आउट झाला. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरने भारताची इनिंग सावरली. या दोघांनीही हाफसेंच्युरी ठोकली. सचिन 53 तर गंभीर 50 रन्सवर आउट झाले. यानंतर विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी झटपट आऊट झाले. पण पुन्हा एकदा टीमच्या मदतीला धावून आला तो युवराज सिंग. सुरेश रैनाच्या मदतीने त्याने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाच, पण 2003 वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा वचपाही काढला. भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात करत सेमीफायनलमध्ये धडक मारलीय आणि आता सेमीफायनलमध्ये भारताची गाठ पडणार आहे ती पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. 30 मार्चला मोहालीत भारत आणि पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये आमने सामने येईल.विजयाचा हिरो युवराजभारताच्या विजयाचा हिरो ठरला तो पुन्हा एकदा युवराज सिंग. सचिन तेंडुलकरने भारताच्या विजयाचा पाया रचला तर युवराज सिंगने विजयावर कळस चढवला. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या युवराजने अखेरपर्यंत मैदानावर उभं राहत भारताला शानदार विजय मिळवून दिला. आधी बॉलिंगमध्ये त्याने 2 विकेट घेतल्या. नंतर बॅटिंगमध्ये त्याने शानदार हाफसेंच्युरी ठोकली. अवघ्या 65 बॉलमध्ये त्याने 8 फोर मारत नॉटआऊट 57 रन्स केले. आतापर्यंत खेळलेल्या सात मॅचमध्ये तब्बल चौथ्यांदा युवराजनं मॅन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला आहे. धावांचा बादशहामास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीच्या सेच्युरीचा रेकॉर्ड अपूर्ण राहिला. सचिन 53 रन्सवर आउट झाला. पण त्याने नवा रेकॉर्ड केला. वन डे क्रिकेटमध्ये त्याने 18 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला. 451 वन डे क्रिकेटमध्ये त्याने हा रेकॉर्ड केला आहे. यात सचिनने तब्बल 48 सेंच्युरी केल्या आहे. तर नॉटआऊट 200 हा त्याचा सर्वीधिक स्कोर आहे. कांगारूंचा गेम ओव्हरतब्बल 15 वर्ष आणि 7 दिवसानंतर आज अखेर ऑस्ट्रेलियाची क्रिकेटमधील हुकुमशाही भारताने संपुष्टात आणली. आजवर ऑस्ट्रेलियाने विक्रमी तब्बल चार वेळा क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकलाय सगळ्यात पहिलांद्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला तो भारतात 1987 साली. त्यानंतर 9 वर्षांनी पुन्हा भारतातचं झालेल्या 1996 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने धडक दिली. पण 17 मार्च 1996 ला झालेल्या फायनलमध्ये श्रीलंकेन ऑस्ट्रेलियाचा गेम ओव्हर केला होता. योगायोग म्हणजे त्या मॅचमध्ये ही कॅप्टन मार्क टेलरनं सर्वाधिक 74 रन्स केले होते. आणि आजही ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉण्टींगनं टीमसाठी सर्वाधिक 104 रन्स केले. पराभवानंतर मग मात्र पुढची 15 वर्ष ऑस्ट्रेलियाने क्रिकेटवर राज्य केलं. ते राज्य आज भारताने मोटेरावर खल्लास केलं. --------------------------------------------------------------------------------------------- भारताचा स्कोर - 261/5 (47.4)---------------------------------------------------------------------------------------------बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सवीरेंद्र सेहवाग C मायकल हसी B शेन वॉटसन 15 22 2सचिन तेंडुलकर C ब्रॅड हॅडिन B शॉन टेट 53 687 गौतम गंभीर run out कॅमेरॉन व्हाइट 5064 2 विराट कोहली C मायकल हसी डेविड हसी 2433 1युवराज सिंगनाबाद 5765 8 एम.एस.धोणी(C) C मायकल क्लार्क B ब्रेट ली 7 6 1 सुरेश रैना नाबाद 34 28 21हरभजन सिंग झहिर खान पियुष चावला मुनाफ पटेल विकेटस : 1/44 (वीरेंद्र सेहवाग, 8.1 ov.), 2/94 (सचिन तेंडुलकर, 18.1 ov.), 3/143 (विराट कोहली, 28.3 ov.), 4/168 (गौतम गंभीर, 33.2 ov.), 5/187 (एम.एस.धोणी, 37.3 ov.)बॉलर्स OM R Wkts W No Econ ब्रेट ली 8.41451305.36 शॉन टेट 7 052 1 627.43मिचेल जॉन्सन 8 041 0205.13शेन वॉटसन 7 047 1105.29जेसन क्रेझा 9 045 0005मायकल क्लार्क 3 019 0006.33 डेविड हसी 5 0 19 1 0 0 3.8 -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ऑस्ट्रेलियाचा स्कोर - 260/6 (50.0) ------------------------------------------------------------------------------------------------------- बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सशेन वॉटसन B रविचंद्र अश्विन25 385 ब्रॅड हॅडिन (W) C सुरेश रैना B युवराज सिंग 53 6261 रिकी पाँटिंग (C) Cझहिर खान B रविचंद्र अश्विन 104 1187 1मायकल क्लार्क Cझहिर खान B युवराज सिंग 8 19 मायकल हसीB झहिर खान 3 9 कॅमेरॉन व्हाइट c &B झहिर खान12 22 डेविड हसी नाबाद 38 26 31मिचेल जॉन्सन नाबाद 6 6 जेसन क्रेझा ब्रेट ली शॉन टेट विकेटस :1/40 (शेन वॉटसन 10 ov.), 2/110 (ब्रॅड हॅडिन 22.5 ov.), 3/140 (मायकल क्लार्क 30.4 ov.), 4/150 (मायकल हसी 33.3 ov.), 5/190 (कॅमेरॉन व्हाइट 41.2 ov.), 6/245 (रिकी पाँटिंग 48.3 ov.) बॉलर्स OM R Wkts W No Econ रविचंद्र अश्विन 100522105.2 झहिर खान 10 053 2 005.3हरभजन सिंग 10 050 0405मुनाफ पटेल 7 044 0006.29युवराज सिंग 10 044 2004.5सचिन तेंडुलकर 2 0 6 0006 विराट कोहली 1 0 6 0 0 0 6

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 06:34 PM IST

कांगारूंचा गेम ओव्हर, आता पाकिस्तानची बारी

24 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या पराभवामुळे तब्बल 12 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपमधील मक्तेदारी संपली आहे. भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो पुन्हा एकदा ऑलराऊंडर युवराज सिंग. युवराजने 57 रन्स करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ऑस्ट्रेलियानं विजयासाठी भारतासमोर 261 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवागन 15 रन्स करुन आउट झाला. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरने भारताची इनिंग सावरली. या दोघांनीही हाफसेंच्युरी ठोकली. सचिन 53 तर गंभीर 50 रन्सवर आउट झाले. यानंतर विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी झटपट आऊट झाले. पण पुन्हा एकदा टीमच्या मदतीला धावून आला तो युवराज सिंग. सुरेश रैनाच्या मदतीने त्याने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाच, पण 2003 वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा वचपाही काढला.

भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात करत सेमीफायनलमध्ये धडक मारलीय आणि आता सेमीफायनलमध्ये भारताची गाठ पडणार आहे ती पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. 30 मार्चला मोहालीत भारत आणि पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये आमने सामने येईल.

विजयाचा हिरो युवराज

भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो पुन्हा एकदा युवराज सिंग. सचिन तेंडुलकरने भारताच्या विजयाचा पाया रचला तर युवराज सिंगने विजयावर कळस चढवला. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या युवराजने अखेरपर्यंत मैदानावर उभं राहत भारताला शानदार विजय मिळवून दिला. आधी बॉलिंगमध्ये त्याने 2 विकेट घेतल्या. नंतर बॅटिंगमध्ये त्याने शानदार हाफसेंच्युरी ठोकली. अवघ्या 65 बॉलमध्ये त्याने 8 फोर मारत नॉटआऊट 57 रन्स केले. आतापर्यंत खेळलेल्या सात मॅचमध्ये तब्बल चौथ्यांदा युवराजनं मॅन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला आहे.

धावांचा बादशहा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीच्या सेच्युरीचा रेकॉर्ड अपूर्ण राहिला. सचिन 53 रन्सवर आउट झाला. पण त्याने नवा रेकॉर्ड केला. वन डे क्रिकेटमध्ये त्याने 18 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला. 451 वन डे क्रिकेटमध्ये त्याने हा रेकॉर्ड केला आहे. यात सचिनने तब्बल 48 सेंच्युरी केल्या आहे. तर नॉटआऊट 200 हा त्याचा सर्वीधिक स्कोर आहे.

कांगारूंचा गेम ओव्हर

तब्बल 15 वर्ष आणि 7 दिवसानंतर आज अखेर ऑस्ट्रेलियाची क्रिकेटमधील हुकुमशाही भारताने संपुष्टात आणली. आजवर ऑस्ट्रेलियाने विक्रमी तब्बल चार वेळा क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकलाय सगळ्यात पहिलांद्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला तो भारतात 1987 साली. त्यानंतर 9 वर्षांनी पुन्हा भारतातचं झालेल्या 1996 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने धडक दिली. पण 17 मार्च 1996 ला झालेल्या फायनलमध्ये श्रीलंकेन ऑस्ट्रेलियाचा गेम ओव्हर केला होता. योगायोग म्हणजे त्या मॅचमध्ये ही कॅप्टन मार्क टेलरनं सर्वाधिक 74 रन्स केले होते. आणि आजही ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉण्टींगनं टीमसाठी सर्वाधिक 104 रन्स केले. पराभवानंतर मग मात्र पुढची 15 वर्ष ऑस्ट्रेलियाने क्रिकेटवर राज्य केलं. ते राज्य आज भारताने मोटेरावर खल्लास केलं.

---------------------------------------------------------------------------------------------

भारताचा स्कोर - 261/5 (47.4)

---------------------------------------------------------------------------------------------

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सवीरेंद्र सेहवाग C मायकल हसी B शेन वॉटसन 15 22 2सचिन तेंडुलकर C ब्रॅड हॅडिन B शॉन टेट 53 687 गौतम गंभीर run out कॅमेरॉन व्हाइट 5064 2 विराट कोहली C मायकल हसी डेविड हसी 2433 1युवराज सिंगनाबाद 5765 8 एम.एस.धोणी(C) C मायकल क्लार्क B ब्रेट ली 7 6 1 सुरेश रैना नाबाद 34 28 21हरभजन सिंग झहिर खान पियुष चावला मुनाफ पटेल

विकेटस : 1/44 (वीरेंद्र सेहवाग, 8.1 ov.), 2/94 (सचिन तेंडुलकर, 18.1 ov.), 3/143 (विराट कोहली, 28.3 ov.), 4/168 (गौतम गंभीर, 33.2 ov.), 5/187 (एम.एस.धोणी, 37.3 ov.)

बॉलर्स OM R Wkts W No Econ ब्रेट ली 8.41451305.36 शॉन टेट 7 052 1 627.43मिचेल जॉन्सन 8 041 0205.13शेन वॉटसन 7 047 1105.29जेसन क्रेझा 9 045 0005मायकल क्लार्क 3 019 0006.33

डेविड हसी 5 0 19 1 0 0 3.8

----------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------------------

ऑस्ट्रेलियाचा स्कोर - 260/6 (50.0)

-------------------------------------------------------------------------------------------------------

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सशेन वॉटसन B रविचंद्र अश्विन25 385 ब्रॅड हॅडिन (W) C सुरेश रैना B युवराज सिंग 53 6261 रिकी पाँटिंग (C) Cझहिर खान B रविचंद्र अश्विन 104 1187 1मायकल क्लार्क Cझहिर खान B युवराज सिंग 8 19 मायकल हसीB झहिर खान 3 9 कॅमेरॉन व्हाइट c &B झहिर खान12 22 डेविड हसी नाबाद 38 26 31मिचेल जॉन्सन नाबाद 6 6 जेसन क्रेझा ब्रेट ली शॉन टेट

विकेटस :1/40 (शेन वॉटसन 10 ov.), 2/110 (ब्रॅड हॅडिन 22.5 ov.), 3/140 (मायकल क्लार्क 30.4 ov.), 4/150 (मायकल हसी 33.3 ov.), 5/190 (कॅमेरॉन व्हाइट 41.2 ov.), 6/245 (रिकी पाँटिंग 48.3 ov.)

बॉलर्स OM R Wkts W No Econ रविचंद्र अश्विन 100522105.2 झहिर खान 10 053 2 005.3हरभजन सिंग 10 050 0405मुनाफ पटेल 7 044 0006.29युवराज सिंग 10 044 2004.5सचिन तेंडुलकर 2 0 6 0006

विराट कोहली 1 0 6 0 0 0 6

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close