S M L

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या विरोधात आदिवासींची लोकयात्रा

26 मार्चछत्तीसगढ राज्याच्या बस्तर भागात गेल्या सहा महिन्यापासून दंडकारण्य शांती संघर्ष समिती नक्षलवादी चळवळीचा अहिंसेच्या मार्गानं मुकाबला करीत आहे. या समितीच्या वतीनं आज शनिवारपासून तीन दिवस गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागात यात्रा काढण्यात येत आहे. यात सामाजिक कार्यकर्ते के. मधुकरराव या लोकयात्रेचं नेतृत्व करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 30 वर्षात नक्षली हल्यात अनेक निरपराध लोक मारले गेले. त्या सोबतच जिल्ह्याच्या विकासाला खिळी बसली . नक्षलवाद्यांना स्थानिक आदिवासींनी परतवून लावण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी ही लोक यात्रा महत्वाची समजली जाते. या लोकयात्रेसाठी भामरागड परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात येत आहे. विशेष डीआयजी सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत हे आंदोलन आणि त्याविषयाची सुरक्षा याबद्दल माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 10:10 AM IST

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या विरोधात आदिवासींची लोकयात्रा

26 मार्चछत्तीसगढ राज्याच्या बस्तर भागात गेल्या सहा महिन्यापासून दंडकारण्य शांती संघर्ष समिती नक्षलवादी चळवळीचा अहिंसेच्या मार्गानं मुकाबला करीत आहे. या समितीच्या वतीनं आज शनिवारपासून तीन दिवस गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागात यात्रा काढण्यात येत आहे. यात सामाजिक कार्यकर्ते के. मधुकरराव या लोकयात्रेचं नेतृत्व करणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 30 वर्षात नक्षली हल्यात अनेक निरपराध लोक मारले गेले. त्या सोबतच जिल्ह्याच्या विकासाला खिळी बसली . नक्षलवाद्यांना स्थानिक आदिवासींनी परतवून लावण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी ही लोक यात्रा महत्वाची समजली जाते. या लोकयात्रेसाठी भामरागड परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात येत आहे. विशेष डीआयजी सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत हे आंदोलन आणि त्याविषयाची सुरक्षा याबद्दल माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close