S M L

खा. शिवाजीराव पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

26 मार्चखेडचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीनं मंचर इथं बांधण्यात येत असलेल्या दोन इमारतींचं बांधकाम आढळराव पाटील यांनी बंद पाडलं अशी तक्रार त्यांच्याविरुद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ज्युनियर इंजिनियरने यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामात अडथळा आणि दमदाटी केल्याचा गुन्हा आढळराव-पाटील यांच्यासह पाचजणांवर दाखल करण्यात आला आहे. मात्र ही कारवाई जाणीवपूर्वक केल्याचा आरोप आढळराव-पाटलांनी केला आहे. विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या इशार्‍यावरुन हे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही आढळराव पाटील यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 02:37 PM IST

खा. शिवाजीराव पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

26 मार्च

खेडचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीनं मंचर इथं बांधण्यात येत असलेल्या दोन इमारतींचं बांधकाम आढळराव पाटील यांनी बंद पाडलं अशी तक्रार त्यांच्याविरुद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ज्युनियर इंजिनियरने यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सरकारी कामात अडथळा आणि दमदाटी केल्याचा गुन्हा आढळराव-पाटील यांच्यासह पाचजणांवर दाखल करण्यात आला आहे. मात्र ही कारवाई जाणीवपूर्वक केल्याचा आरोप आढळराव-पाटलांनी केला आहे. विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या इशार्‍यावरुन हे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही आढळराव पाटील यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close