S M L

बहिष्कार सुरूच राहील - एकनाथ खडसे

27 मार्चनऊ आमदारांच्या निलंबनावरून चिघळलेलं विधिमंडळातील वातावरण आता चांगलंच तापलंय. विरोधक तडतोडीच्या करायला तयार नाहीत. उलट आता जोपर्यंत विरोधकांच्या मतदारसंघात समान निधीचं वाटप होत नाही तोवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजावर विरोधी पक्षाचा बहिष्कार सुरूच राहील असं विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटच्या वेळी विरोधकांनी घातलेला गोंधळ हा पूर्वनियोजित होता अशी टीका केली होती. त्यामुळे सरकारही तडजोड करण्याच्या भूमिकेत नाही हेही स्पष्ट झालं होतं. अशातच सोमवारी विधिमंडळाचे कामकाज पुन्हा सुरू होत आहे. तेव्हा तडजोडीसाठी कोण पुढाकार घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2011 02:36 PM IST

बहिष्कार सुरूच राहील - एकनाथ खडसे

27 मार्च

नऊ आमदारांच्या निलंबनावरून चिघळलेलं विधिमंडळातील वातावरण आता चांगलंच तापलंय. विरोधक तडतोडीच्या करायला तयार नाहीत. उलट आता जोपर्यंत विरोधकांच्या मतदारसंघात समान निधीचं वाटप होत नाही तोवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजावर विरोधी पक्षाचा बहिष्कार सुरूच राहील असं विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं.

शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटच्या वेळी विरोधकांनी घातलेला गोंधळ हा पूर्वनियोजित होता अशी टीका केली होती. त्यामुळे सरकारही तडजोड करण्याच्या भूमिकेत नाही हेही स्पष्ट झालं होतं. अशातच सोमवारी विधिमंडळाचे कामकाज पुन्हा सुरू होत आहे. तेव्हा तडजोडीसाठी कोण पुढाकार घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2011 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close