S M L

आमदार निलंबन प्रकरणी बैठकीची पहिली फेरी निष्फळ

28 मार्चअर्थसंकल्पात गोंधळ घालणार्‍या युतीच्या नऊ आमदारांच्या निलंबनावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीमध्ये पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून बजेटमधील विकासनिधी वाढवून घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच इतर योजनाच्या निधीवाटपामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांनाही सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत यामागण्यावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. तोपर्यंत विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार कायम राहिल अशी माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली. विरोधकांच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा दुपारी 3 वाजता सरकार आणि विरोधकांमध्ये बैठकीची दुसरी फेरी सुरू होणार आहे. दरम्यान, दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधकांशिवायच सरकार रेटून नेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 08:53 AM IST

आमदार निलंबन प्रकरणी बैठकीची पहिली फेरी निष्फळ

28 मार्च

अर्थसंकल्पात गोंधळ घालणार्‍या युतीच्या नऊ आमदारांच्या निलंबनावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीमध्ये पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून बजेटमधील विकासनिधी वाढवून घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच इतर योजनाच्या निधीवाटपामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांनाही सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत यामागण्यावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. तोपर्यंत विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार कायम राहिल अशी माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली. विरोधकांच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा दुपारी 3 वाजता सरकार आणि विरोधकांमध्ये बैठकीची दुसरी फेरी सुरू होणार आहे. दरम्यान, दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधकांशिवायच सरकार रेटून नेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close