S M L

राज्य निघालंय दिवाळखोरीत - एकनाथ खडसे

29 मार्चराज्य सरकार दिवाळखोरीत आहे असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. 1 लाख 21 हजार कोटींचा अर्थसंकल्प हा असंख्य वित्तीय अनियमिततांनी भरलेला आहे अशीच दमदार सुरूवात करत विरोधकांनी बजेटच्या चर्चेला सुरूवात केली. अर्थमंत्र्यानी गेल्या तीन वर्षात एकदाही ओव्हरड्राफ्ट काढलेला नाही असा दावा बजेटच्या भाषणात केला होता. विराधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणातून या दाव्याला आव्हान दिलं आहे. या कर्ज काढण्यामुळेच हे राज्य डबघाईला पोहचलंय यापुढे आपल्याला कर्जच मिळणार नाही अशी परिस्थिती असल्याचंही खडसे म्हणाले आहेत. बजेटनंतरचा गोंधळ, विरोधकांच्या मागण्या या सगळ्या घटकांना प्रतिबिंबही खडसेंच्या भाषणात होतं. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खात्यांमधील निधीची तफावत खुबीनं वापरली. शिवाय आपल्या बहिष्कारावेळच्या मागण्याही रेटल्या. विरोधकांच्या आरोपांना आणि मुद्यांना अर्थमंत्री गुरूवारी उत्तर देणार आहेत. तुमच्या मागण्याबद्दल याच उत्तरामध्ये सकारात्मक विचार करतो असं सरकारकडून विरोधकांना सांगितलं गेलयं. याच आश्वासनावर विरोधकांनी बहिष्कार मागे घेतल्याचं म्हटलं जातंय. म्हणूनच त्यांच्या मागण्या सरकार मान्य करतं का यासाठी सगळ्यांचे अजित पवारांकडे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2011 12:20 PM IST

राज्य निघालंय दिवाळखोरीत - एकनाथ खडसे

29 मार्चराज्य सरकार दिवाळखोरीत आहे असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. 1 लाख 21 हजार कोटींचा अर्थसंकल्प हा असंख्य वित्तीय अनियमिततांनी भरलेला आहे अशीच दमदार सुरूवात करत विरोधकांनी बजेटच्या चर्चेला सुरूवात केली. अर्थमंत्र्यानी गेल्या तीन वर्षात एकदाही ओव्हरड्राफ्ट काढलेला नाही असा दावा बजेटच्या भाषणात केला होता. विराधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणातून या दाव्याला आव्हान दिलं आहे. या कर्ज काढण्यामुळेच हे राज्य डबघाईला पोहचलंय यापुढे आपल्याला कर्जच मिळणार नाही अशी परिस्थिती असल्याचंही खडसे म्हणाले आहेत.

बजेटनंतरचा गोंधळ, विरोधकांच्या मागण्या या सगळ्या घटकांना प्रतिबिंबही खडसेंच्या भाषणात होतं. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खात्यांमधील निधीची तफावत खुबीनं वापरली. शिवाय आपल्या बहिष्कारावेळच्या मागण्याही रेटल्या. विरोधकांच्या आरोपांना आणि मुद्यांना अर्थमंत्री गुरूवारी उत्तर देणार आहेत. तुमच्या मागण्याबद्दल याच उत्तरामध्ये सकारात्मक विचार करतो असं सरकारकडून विरोधकांना सांगितलं गेलयं. याच आश्वासनावर विरोधकांनी बहिष्कार मागे घेतल्याचं म्हटलं जातंय. म्हणूनच त्यांच्या मागण्या सरकार मान्य करतं का यासाठी सगळ्यांचे अजित पवारांकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close