S M L

सचिनने तयार केलं एक 'ब्रम्हास्त्र' !

29 मार्च30 मार्चला वर्ल्ड कपमधील सर्वात चुरशीची मॅच रंगणार आहे. भारत-आणि पाकिस्तान दरम्यानची ही मॅच प्रत्येक खेळाडूसाठी करो या मरोची असणार आहे. या मॅचसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सज्ज झाला आहे आणि या मॅचसाठी त्यानं तयार केले आहे एक ब्रम्हास्त्र. ज्याच्या जोरावर पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडिया करणार आहे फायनलमध्ये प्रवेश.तब्बल 28 वर्षांनी वर्ल्ड कप पटकावण्यापासून भारतीय टीम आता केवळ दोन पावलं दूर आहे. आणि ही संधी सचिनला चुकवायची नाही आहे. गेल्या 5 वर्ल्ड कप स्पर्धेत जे स्वप्न अपूर्ण राहिलं ते स्वप्न सचिनला पूर्ण करायचे आहे. आणि यासाठीच सचिनने तयार केले आहे. एक खास ब्रम्हास्त्र म्हणजेच नवी बॅट. पाकिस्तानविरुध्दच्या मॅचमध्ये या बॅटने रन्सचा पाऊस पाडत पाकिस्तान टीमला पराभवाची चव चाखायला लावली आहे. आपल्या या नव्या बॅटवर त्यानं खास मेहनत घेतली रबराच्या हातोड्यानं सचिननं बॅटच्या स्ट्रोकचा अंदाज घेतला आहे. आणि आता हीच बॅट पाकिस्तानी बॉलर्सवर हातोड्यासारखी बरसणार आहे.या नव्या बॅटने सचिनने भरपूर सराव केला आहे.आणि यानंतर त्यानं ही बॅट सोपवली गौतम गंभीरकडे. गंभीरने दमदार फटके मारत बॅटला मजबूती दिली. यानंतर ही बॅट आली युवराजच्या हातात. डावखुर्‍या युवराजने ही बॅट घेऊन चक्क उजव्या हाताने बॅटिंगची प्रॅक्टिस केली. या दरम्यान दूर उभं राहत सचिनने या नव्या बॅटने खेळल्या जाणार्‍या शॉट्सचे निरखुन परिक्षण केले आहे.21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनच्या नावावर 99 सेंच्युरी आहेत. कदाचित या नव्या बॅटने सचिन सेंच्युरीची सेंच्युरी पूर्ण करेल. कदाचित याच बॅटनं सचिन भारतीय टीमला मिळवून देईल वर्ल्ड कप.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2011 12:54 PM IST

सचिनने तयार केलं एक 'ब्रम्हास्त्र' !

29 मार्च

30 मार्चला वर्ल्ड कपमधील सर्वात चुरशीची मॅच रंगणार आहे. भारत-आणि पाकिस्तान दरम्यानची ही मॅच प्रत्येक खेळाडूसाठी करो या मरोची असणार आहे. या मॅचसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सज्ज झाला आहे आणि या मॅचसाठी त्यानं तयार केले आहे एक ब्रम्हास्त्र. ज्याच्या जोरावर पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडिया करणार आहे फायनलमध्ये प्रवेश.

तब्बल 28 वर्षांनी वर्ल्ड कप पटकावण्यापासून भारतीय टीम आता केवळ दोन पावलं दूर आहे. आणि ही संधी सचिनला चुकवायची नाही आहे. गेल्या 5 वर्ल्ड कप स्पर्धेत जे स्वप्न अपूर्ण राहिलं ते स्वप्न सचिनला पूर्ण करायचे आहे. आणि यासाठीच सचिनने तयार केले आहे. एक खास ब्रम्हास्त्र म्हणजेच नवी बॅट. पाकिस्तानविरुध्दच्या मॅचमध्ये या बॅटने रन्सचा पाऊस पाडत पाकिस्तान टीमला पराभवाची चव चाखायला लावली आहे. आपल्या या नव्या बॅटवर त्यानं खास मेहनत घेतली रबराच्या हातोड्यानं सचिननं बॅटच्या स्ट्रोकचा अंदाज घेतला आहे. आणि आता हीच बॅट पाकिस्तानी बॉलर्सवर हातोड्यासारखी बरसणार आहे.

या नव्या बॅटने सचिनने भरपूर सराव केला आहे.आणि यानंतर त्यानं ही बॅट सोपवली गौतम गंभीरकडे. गंभीरने दमदार फटके मारत बॅटला मजबूती दिली. यानंतर ही बॅट आली युवराजच्या हातात. डावखुर्‍या युवराजने ही बॅट घेऊन चक्क उजव्या हाताने बॅटिंगची प्रॅक्टिस केली. या दरम्यान दूर उभं राहत सचिनने या नव्या बॅटने खेळल्या जाणार्‍या शॉट्सचे निरखुन परिक्षण केले आहे.

21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनच्या नावावर 99 सेंच्युरी आहेत. कदाचित या नव्या बॅटने सचिन सेंच्युरीची सेंच्युरी पूर्ण करेल. कदाचित याच बॅटनं सचिन भारतीय टीमला मिळवून देईल वर्ल्ड कप.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close