S M L

कुविख्यात गुन्हेगार छोटुसिंग पोलिसांच्या जाळ्यात

29 मार्चझारखंडच्या रांची पोलिसांना हवा असलेला नक्षलवादी छोटुसिंग मुंडा आणि त्याच्या एका साथीदाराला शहाद्यात अटक केली आहे. छोटुसिंग अपहरण, स्फोट, खून अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. छोटुसिंग हा लोकल गोरीला स्कॉडचा कमांडर असून तो आणि त्याचा साथीदार एका सूतगिरणीत नाव बदलून काम करत होते. रांचीचे डीवायएसपी अपूर्व आणि शहाद्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र रायसिंग यांनी सापळा रचून त्यांना अटक केली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सूतगिरणीतही त्यांनी काही दिवस काम केलं होतं. छोटूसिंगवर रांचीच्या डीवायएसपीची हत्या, भूसुरूंग स्फोट, अपहरण असे 14 गुन्हे दाखल आहेत. या दोघांना सात दिवसांचा ट्रान्झीट रिमान्ड देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2011 02:53 PM IST

कुविख्यात गुन्हेगार छोटुसिंग पोलिसांच्या जाळ्यात

29 मार्च

झारखंडच्या रांची पोलिसांना हवा असलेला नक्षलवादी छोटुसिंग मुंडा आणि त्याच्या एका साथीदाराला शहाद्यात अटक केली आहे. छोटुसिंग अपहरण, स्फोट, खून अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. छोटुसिंग हा लोकल गोरीला स्कॉडचा कमांडर असून तो आणि त्याचा साथीदार एका सूतगिरणीत नाव बदलून काम करत होते.

रांचीचे डीवायएसपी अपूर्व आणि शहाद्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र रायसिंग यांनी सापळा रचून त्यांना अटक केली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सूतगिरणीतही त्यांनी काही दिवस काम केलं होतं. छोटूसिंगवर रांचीच्या डीवायएसपीची हत्या, भूसुरूंग स्फोट, अपहरण असे 14 गुन्हे दाखल आहेत. या दोघांना सात दिवसांचा ट्रान्झीट रिमान्ड देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close