S M L

पाईपलाईनमध्ये बिबट्याचा घरोबा..

29 मार्चमुंबईत गोरेगाव येथे आरे कॉलनीत गेल्या आठ तासांपासून एका बिबट्या पावसाळी पाईपलाईनमध्ये आराम करतोय. रस्ता चुकल्याने हा बिबट्या चक्क पाईपलाइनमध्येच जाऊन बसला आहे. आता या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी चक्क मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड आणि वनअधिकार्‍यांनी प्रयत्न केले. पण हे महाशय पाईपलाइनमध्ये आरामात पहुडले आहेत. सध्या तरी यातून बाहेर येण्याचा त्यांचा विचार दिसत नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून वनाधिकार्‍यांनी पाईपलाइनच्या एका तोंडाला पिंजरा लावला आहे. तर दुसर्‍या बाजूचं तोंड बंद करण्यात आलंय. तसेच या महाशयांची उपासमोर होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी खास कोंबडीचा बेतही वनाधिकार्‍यांनी ठेवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2011 06:22 PM IST

पाईपलाईनमध्ये बिबट्याचा घरोबा..

29 मार्च

मुंबईत गोरेगाव येथे आरे कॉलनीत गेल्या आठ तासांपासून एका बिबट्या पावसाळी पाईपलाईनमध्ये आराम करतोय. रस्ता चुकल्याने हा बिबट्या चक्क पाईपलाइनमध्येच जाऊन बसला आहे. आता या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी चक्क मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड आणि वनअधिकार्‍यांनी प्रयत्न केले. पण हे महाशय पाईपलाइनमध्ये आरामात पहुडले आहेत.

सध्या तरी यातून बाहेर येण्याचा त्यांचा विचार दिसत नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून वनाधिकार्‍यांनी पाईपलाइनच्या एका तोंडाला पिंजरा लावला आहे. तर दुसर्‍या बाजूचं तोंड बंद करण्यात आलंय. तसेच या महाशयांची उपासमोर होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी खास कोंबडीचा बेतही वनाधिकार्‍यांनी ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 06:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close