S M L

पाकच्या 9 गडी माघारी भारत फायनलच्या वाटेवर

30 मार्चमोहालीत भारत आणि पाकिस्तान सेमी फायनल चांगलीच रंगात आली आहे. भारताने ठेवलेल्या 261 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली आहे. पाकिस्तानचे सहा बॅटसमन 150 रन्सवरचं आऊट झाले तेव्हा टीमची कमान सांभाळण्यासाठी आलेल्या कर्णधार शाहिद आफ्रिदीने 17 बॉलचा सामना करत एका चौकारासह 19 करून तंबूत परतला. हरभजन सिंगनं शाहिदला तंबूचा रस्ता दाखवला आणि या मॅच मधला महत्वाचा बळी आपल्या नावावर टिपला. या पाठोपाठ आलेला वहिब रईज ही 8 रन्स करून तंबूत परतला. आणि विशेष म्हणजे युवराजने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बॅटिंगला खिंडारपाडलं आहे. युवराजने असद शफिक आणि युनीस खानची विकेट काढली आहे. तर झहिर खानने कामरान अकमलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोहम्मद हाफिझचा अडथळा मुनाफ पटेलनं दुर केला. याआधी भारताने टॉस जिंकत पहिली बॅटिंग केली होती. सचिनने केलेल्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने पाकसमोर 261 रन्सचे आव्हान ठेवले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 04:47 PM IST

पाकच्या 9 गडी माघारी भारत फायनलच्या वाटेवर

30 मार्च

मोहालीत भारत आणि पाकिस्तान सेमी फायनल चांगलीच रंगात आली आहे. भारताने ठेवलेल्या 261 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली आहे. पाकिस्तानचे सहा बॅटसमन 150 रन्सवरचं आऊट झाले तेव्हा टीमची कमान सांभाळण्यासाठी आलेल्या कर्णधार शाहिद आफ्रिदीने 17 बॉलचा सामना करत एका चौकारासह 19 करून तंबूत परतला. हरभजन सिंगनं शाहिदला तंबूचा रस्ता दाखवला आणि या मॅच मधला महत्वाचा बळी आपल्या नावावर टिपला. या पाठोपाठ आलेला वहिब रईज ही 8 रन्स करून तंबूत परतला. आणि विशेष म्हणजे युवराजने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बॅटिंगला खिंडारपाडलं आहे. युवराजने असद शफिक आणि युनीस खानची विकेट काढली आहे. तर झहिर खानने कामरान अकमलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोहम्मद हाफिझचा अडथळा मुनाफ पटेलनं दुर केला. याआधी भारताने टॉस जिंकत पहिली बॅटिंग केली होती. सचिनने केलेल्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने पाकसमोर 261 रन्सचे आव्हान ठेवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close