S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयने फास आवळला

1 एप्रिल 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केली आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी टेलिकॉम मंत्री ए. राजा, शाहीद बलवा आणि काही टेलिकॉम कंपन्याव्यतिरिक्तही अनेकांचे या घोटाळ्याशी संबध आहेत. मुंबईतील लिलावती हॉस्पिटलच्या काही विश्वस्तांचाही 2जी घोटाळ्याशी संबध असल्याचे पुरावे आयबीएन नेटवर्कच्या हाती लागले आहेत. 2 जी घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात सीबीआयने मॉरिशस सरकारला पत्र लिहून काही कंपन्यांची माहिती मागवली आहे. इटीसालट मॉरिशस लिमिटेड, डेल्फी इन्वेस्टमेंट लिमिटेड आणि डेक्कन एशिअन इन्फास्ट्रक्चरसह 12 कंपन्याच्या व्यवहारांची माहिती सीबीआयने मागवली आहे. या माहितीतून या कंपन्यांचे पत्ते आणि लिलावती हॉस्पिटलच्या ट्रस्टींच्या कंपन्यांचे पत्तेही सारखेच असल्याच स्पष्ट होतंय. मागच्याच महिन्यात आयबीएन नेटवर्कने लिलावती हॉस्पिटल्सचे ट्रस्टी मेहतांच्या काळ्या पैशासंदर्भात खुलासा केला होता. आणि आता 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात मेहता बंधुंचे संबधामुळे खळबळ माजली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 10:32 AM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयने फास आवळला

1 एप्रिल

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केली आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी टेलिकॉम मंत्री ए. राजा, शाहीद बलवा आणि काही टेलिकॉम कंपन्याव्यतिरिक्तही अनेकांचे या घोटाळ्याशी संबध आहेत. मुंबईतील लिलावती हॉस्पिटलच्या काही विश्वस्तांचाही 2जी घोटाळ्याशी संबध असल्याचे पुरावे आयबीएन नेटवर्कच्या हाती लागले आहेत.

2 जी घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात सीबीआयने मॉरिशस सरकारला पत्र लिहून काही कंपन्यांची माहिती मागवली आहे. इटीसालट मॉरिशस लिमिटेड, डेल्फी इन्वेस्टमेंट लिमिटेड आणि डेक्कन एशिअन इन्फास्ट्रक्चरसह 12 कंपन्याच्या व्यवहारांची माहिती सीबीआयने मागवली आहे.

या माहितीतून या कंपन्यांचे पत्ते आणि लिलावती हॉस्पिटलच्या ट्रस्टींच्या कंपन्यांचे पत्तेही सारखेच असल्याच स्पष्ट होतंय. मागच्याच महिन्यात आयबीएन नेटवर्कने लिलावती हॉस्पिटल्सचे ट्रस्टी मेहतांच्या काळ्या पैशासंदर्भात खुलासा केला होता. आणि आता 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात मेहता बंधुंचे संबधामुळे खळबळ माजली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close