S M L

'मोनिकाची हत्या चुकून झाली!' मारेकर्‍यांची कबुली

01 एप्रिलनागपूरच्या मोनिका किरणापुरे हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोनिकाची हत्या चुकून झाली दुसर्‍याच मुलीचा खून करण्याचा कट आपण रचला होता अशी कबुली श्रीकांत सोनेकर नावाच्या व्यक्तीने दिली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी श्रीकांत आहे. कुणाल जयस्वाल नावाच्या मुलाने श्रीकांतला सुपारी दिली होती. मोनिकाच्याच कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला शिकणार्‍या एका मुलीने कुणालला नकार दिला होता. त्याने तिला मारण्याची सुपारी दिली पण स्कार्फ बांधलेल्या मोनिकाला ओळखता न आल्याने तिचा खून झाला अशी कबुली श्रीकांत सोनेकरने दिली. नागपूरच्या नंदनवन भागातल्या प्रतिभा पवार होस्टेलमधून मोनिका किरणापूरे ही इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी सकाळी 10:15 ला आपल्या कॉलेजकडे निघाली. मोबाईलवर ती आईशी बोलत चालली होती. अचानक दोन तरुणांनी तिच्यामागून सुरीनं तिच्या मानेवर हल्ला केला.आणि काही क्षणांतच मोनिकाचा मृत्यू झाला. तो दिवस होता 11 मार्च. दोन दिवसानंतर तिच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या घटनेची दखल घेत स्वत:हून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. 'जस्टिस फॉर मोनिका' असा नारा देतं. भर दिवसा झालेल्या या खुनाच्या वेळी अनेक लोक बघत होते पण कुणीही पुढे येत नव्हतं. विद्यार्थ्यांनी या मोर्चामध्ये लोकांना पुढे येण्याचे आवाहनही केलं.पोलिसांनी हा तपास क्राईम ब्रँचकडे दिला. यासाठी नऊ टीम तयार करण्यात आल्या.मोनिकाच्या तीन सिम कार्ड मधून तब्बल सोळा हजार कॉल्स झाल्याची नोंद झाली. चंद्रपूर, भोपाळ, आणि मुंबईतून 22 लोकांची चौकशी झाली. पण हाती काहीच लागलं नाही.दरम्यान आयुक्तांनी नंदनवनचे पोलीस निरिक्षक बोराडे यांची बदली केली..मोनिकाचे आई-वडिल आणि पोलीस आयुक्तांनी लोकांना पुढे येऊन साक्ष देण्याचे आवाहन केलं. पोलिसांनी कॉल डिटेल्सवरून अनेकांची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. श्रीकांत सोनेकर ला ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर हे मोनिकाच्या खुनाचे कारण उघड झालं. कुणाल जैस्वाल ने आपल्या प्रेयसीला मारण्यासाठी दीड लाखाची सुपारी दिली होती. असा जबाब त्यानं पोलिसांना दिला. पोलिसांनी याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. नंदनवनमध्ये राहणार्‍या मोनिकाचा नाहक बळी गेला कारण मोनिकाच्या ऐवजी मारेकर्‍यांचा निशाणा होता त्याच कॉलेजच्या दुसर्‍या मुलीवर कुणालचे त्या मुलीशी भांडण झालं होतं आणि त्या वैमनस्यातून कुणाल नं ही सुपारी दिड लाखात दिली होती. जस्टीस फॉर मोनिका असं म्हणत न्यायासाठी लढणार्‍या नागपूरकरांना ही मारेकर्‍यांची माहिती ऐकल्यावर धक्का बसला. भांडणं, खुनाची सुपारी या सगळ्या प्रकरणात निष्पाप मोनिकाचा हकनाक बळी गेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 03:10 PM IST

'मोनिकाची हत्या चुकून झाली!' मारेकर्‍यांची कबुली

01 एप्रिल

नागपूरच्या मोनिका किरणापुरे हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोनिकाची हत्या चुकून झाली दुसर्‍याच मुलीचा खून करण्याचा कट आपण रचला होता अशी कबुली श्रीकांत सोनेकर नावाच्या व्यक्तीने दिली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी श्रीकांत आहे. कुणाल जयस्वाल नावाच्या मुलाने श्रीकांतला सुपारी दिली होती. मोनिकाच्याच कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला शिकणार्‍या एका मुलीने कुणालला नकार दिला होता. त्याने तिला मारण्याची सुपारी दिली पण स्कार्फ बांधलेल्या मोनिकाला ओळखता न आल्याने तिचा खून झाला अशी कबुली श्रीकांत सोनेकरने दिली.

नागपूरच्या नंदनवन भागातल्या प्रतिभा पवार होस्टेलमधून मोनिका किरणापूरे ही इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी सकाळी 10:15 ला आपल्या कॉलेजकडे निघाली. मोबाईलवर ती आईशी बोलत चालली होती. अचानक दोन तरुणांनी तिच्यामागून सुरीनं तिच्या मानेवर हल्ला केला.आणि काही क्षणांतच मोनिकाचा मृत्यू झाला. तो दिवस होता 11 मार्च. दोन दिवसानंतर तिच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या घटनेची दखल घेत स्वत:हून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. 'जस्टिस फॉर मोनिका' असा नारा देतं. भर दिवसा झालेल्या या खुनाच्या वेळी अनेक लोक बघत होते पण कुणीही पुढे येत नव्हतं. विद्यार्थ्यांनी या मोर्चामध्ये लोकांना पुढे येण्याचे आवाहनही केलं.

पोलिसांनी हा तपास क्राईम ब्रँचकडे दिला. यासाठी नऊ टीम तयार करण्यात आल्या.मोनिकाच्या तीन सिम कार्ड मधून तब्बल सोळा हजार कॉल्स झाल्याची नोंद झाली. चंद्रपूर, भोपाळ, आणि मुंबईतून 22 लोकांची चौकशी झाली. पण हाती काहीच लागलं नाही.

दरम्यान आयुक्तांनी नंदनवनचे पोलीस निरिक्षक बोराडे यांची बदली केली..मोनिकाचे आई-वडिल आणि पोलीस आयुक्तांनी लोकांना पुढे येऊन साक्ष देण्याचे आवाहन केलं. पोलिसांनी कॉल डिटेल्सवरून अनेकांची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. श्रीकांत सोनेकर ला ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर हे मोनिकाच्या खुनाचे कारण उघड झालं. कुणाल जैस्वाल ने आपल्या प्रेयसीला मारण्यासाठी दीड लाखाची सुपारी दिली होती. असा जबाब त्यानं पोलिसांना दिला. पोलिसांनी याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

नंदनवनमध्ये राहणार्‍या मोनिकाचा नाहक बळी गेला कारण मोनिकाच्या ऐवजी मारेकर्‍यांचा निशाणा होता त्याच कॉलेजच्या दुसर्‍या मुलीवर कुणालचे त्या मुलीशी भांडण झालं होतं आणि त्या वैमनस्यातून कुणाल नं ही सुपारी दिड लाखात दिली होती. जस्टीस फॉर मोनिका असं म्हणत न्यायासाठी लढणार्‍या नागपूरकरांना ही मारेकर्‍यांची माहिती ऐकल्यावर धक्का बसला. भांडणं, खुनाची सुपारी या सगळ्या प्रकरणात निष्पाप मोनिकाचा हकनाक बळी गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close