S M L

रत्नागिरीच्या कुडोशी गावात वणवा भडकला

01 एप्रिलरत्नागिरीतील कुडोशी गावात प्रचंड वणवा भडकला आहे. जवळपास सातशे ते आठशे एकर माळरान आणि जंगल आगीच्या भक्षस्थानी पडलं आहे. तसेच या भागातील पाच ते सहा मोठ्या आंबा आणि काजूच्या बागांमधील शेकडो झाडही जळून खाक झाली आहे. कुडोशी गावातील देऊळवाडी बौध्दवाडी आणि टोकवाडी तील घरांनाही या आगीचा फटका बसला आहे. बौध्दवाडीतल्या 10 घरांना या आगीने चारही बाजूने घेरलं होतं मात्र घरातील माणसांनी वेळीच बाहेर पडून आग विझवायचे आटोकाट प्रयत्न केल्यामुळे जीवितहानी टळली. खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझवायचे प्रयत्न चालू आहेत. मात्र डोंगराळ भागात सर्वत्र आग लागल्यामुळे आग्निशमन दलाचा बंब तिथे पोहचू शकत नाही. ग्रामस्थांचे मात्र अजूनही आग विझवायचे प्रय्त्न सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 11:57 AM IST

रत्नागिरीच्या कुडोशी गावात वणवा भडकला

01 एप्रिल

रत्नागिरीतील कुडोशी गावात प्रचंड वणवा भडकला आहे. जवळपास सातशे ते आठशे एकर माळरान आणि जंगल आगीच्या भक्षस्थानी पडलं आहे. तसेच या भागातील पाच ते सहा मोठ्या आंबा आणि काजूच्या बागांमधील शेकडो झाडही जळून खाक झाली आहे. कुडोशी गावातील देऊळवाडी बौध्दवाडी आणि टोकवाडी तील घरांनाही या आगीचा फटका बसला आहे.

बौध्दवाडीतल्या 10 घरांना या आगीने चारही बाजूने घेरलं होतं मात्र घरातील माणसांनी वेळीच बाहेर पडून आग विझवायचे आटोकाट प्रयत्न केल्यामुळे जीवितहानी टळली. खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझवायचे प्रयत्न चालू आहेत. मात्र डोंगराळ भागात सर्वत्र आग लागल्यामुळे आग्निशमन दलाचा बंब तिथे पोहचू शकत नाही. ग्रामस्थांचे मात्र अजूनही आग विझवायचे प्रय्त्न सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close