S M L

आशिष नेहरा खेळण्यावरून प्रश्नचिन्ह

01 एप्रिलश्रीलंकेविरूद्धच्या मेगाफायनलसाठी आता केवळ 24 तास उरले असताना भारतीय संघासमोर एक अडचण उभी राहिली आहे. आशिष नेहराचं बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे फायनलच्या मॅचमध्ये खेळेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये शाहीद आफ्रिदीचा कॅच पकडताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्या हाताचे ऑपरेशन करावे लागले तर सहा आठवडे त्याला खेळापासून दूर रहावे लागणार आहे. शनिवारच्या मॅचपर्यंत तो बरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये 29 रन्स देत उमर गुल आणि वहाब रियाझच्या नेहरानं घेतलेल्या विकेट्स मॅचला कलाटणी देणार्‍या ठरल्या होत्या. दरम्यान श्रीलंकेलाही फायनलपूर्वी मोठा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेला मॅथ्यूजलाही दुखापतीमुळे बाहेर जावं लागल आहे. त्याच्या जागी सूरज रणदीवला संधी मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 12:02 PM IST

आशिष नेहरा खेळण्यावरून प्रश्नचिन्ह

01 एप्रिल

श्रीलंकेविरूद्धच्या मेगाफायनलसाठी आता केवळ 24 तास उरले असताना भारतीय संघासमोर एक अडचण उभी राहिली आहे. आशिष नेहराचं बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे फायनलच्या मॅचमध्ये खेळेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये शाहीद आफ्रिदीचा कॅच पकडताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

त्यामुळे त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्या हाताचे ऑपरेशन करावे लागले तर सहा आठवडे त्याला खेळापासून दूर रहावे लागणार आहे. शनिवारच्या मॅचपर्यंत तो बरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये 29 रन्स देत उमर गुल आणि वहाब रियाझच्या नेहरानं घेतलेल्या विकेट्स मॅचला कलाटणी देणार्‍या ठरल्या होत्या. दरम्यान श्रीलंकेलाही फायनलपूर्वी मोठा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेला मॅथ्यूजलाही दुखापतीमुळे बाहेर जावं लागल आहे. त्याच्या जागी सूरज रणदीवला संधी मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close