S M L

लंकेचे पाच गडी माघारी

02 एप्रिल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या वर्ल्ड कपची फायनल मॅच रंगत आहे. भारतीय टीमनं भेदक बॉलिंग करत पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं आहे. श्रीलंकन टीमने आता 40 व्या ओव्हरनंतर 180 रन्सचा टप्पा पार केला आहे पण पाच महत्त्वाच्या विकेट गमावल्या आहे. ओपनिंगला आलेल्या उपुल थरंगाला झहीर खाननं झटपट आऊट केलं. तर धोकादायक ठरणार्‍या तिलकरत्ने दिलशानला हरभजन सिंगनं क्लिन बोल्ड केलं. दिलशान 33 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर महेला जयवर्धने आणि संगकारा या आजी माजी कॅप्टनच्या जोडीने हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली खरी. पण हरभजनने संगकाराला आउट केलं आणि पव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर आलेल्या युवराज सिंगने आपल्या बॉलिंगवर थिलन समराविराला एलबीडब्लु आउट केलं. युवराज सिंगनं आता पर्यंत दोन विकेट घेतल्या आहे. लंकनं टीमची इंनिग सांभळण्यासाठी आलेल्या कपुगेटरा आणि कुलशेखरा हे क्रमाने आउट झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2011 12:40 PM IST

लंकेचे पाच गडी माघारी

02 एप्रिल

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या वर्ल्ड कपची फायनल मॅच रंगत आहे. भारतीय टीमनं भेदक बॉलिंग करत पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं आहे. श्रीलंकन टीमने आता 40 व्या ओव्हरनंतर 180 रन्सचा टप्पा पार केला आहे पण पाच महत्त्वाच्या विकेट गमावल्या आहे. ओपनिंगला आलेल्या उपुल थरंगाला झहीर खाननं झटपट आऊट केलं. तर धोकादायक ठरणार्‍या तिलकरत्ने दिलशानला हरभजन सिंगनं क्लिन बोल्ड केलं. दिलशान 33 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर महेला जयवर्धने आणि संगकारा या आजी माजी कॅप्टनच्या जोडीने हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली खरी. पण हरभजनने संगकाराला आउट केलं आणि पव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर आलेल्या युवराज सिंगने आपल्या बॉलिंगवर थिलन समराविराला एलबीडब्लु आउट केलं. युवराज सिंगनं आता पर्यंत दोन विकेट घेतल्या आहे. लंकनं टीमची इंनिग सांभळण्यासाठी आलेल्या कपुगेटरा आणि कुलशेखरा हे क्रमाने आउट झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2011 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close