S M L

लंकादहनास यंगब्रिगेडची आगेकूच

02 एप्रिल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कपची मेगाफायनल सुरु आहे. भारताने 3 विकेट गमावत 200 रन्सचा टप्पा केला. श्रीलंकेने विजयासाठी भारतासमोर 275 रन्सचं आव्हान ठेवलंय. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेले वीरेंद्र सेहवाग शुन्यावर तर सचिन 18 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीने इनिंग सावरली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 83 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. पण दिलशानने कोहलीला आउट करत ही जोडी फोडली. कोहली 35 रन्सवर आऊट झाला. गंभीरने मात्र आपली हाफसेंच्युरी पूर्ण केली. याबरोबरच त्यानं वन डे करियरमध्ये 4 हजार रन्सचा टप्पाही पार केला. गंभीरच्या जोडीला आलेल्या कर्णधार धोणीने भक्कम साथ देत निर्णायक आपल्या हाफसेंचुरी सोबत 50 धावाचं योगदान दिलं. भारताला विजयासाठी आणखी 77रन्सची गरज आहे. दरम्यान पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं विजयासाठी भारतासमोर 275 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 11 ओव्हरमध्ये 50 रन्सचा टप्पा पार केला आहे. सेहवाग शुन्यवर तर सचिन 18 रन्सवर झटपट आउट झाले. पण गंभीर आणि विराटने भारताची इनिंग सावरली आहे. दरम्यान अखेरच्या ओव्हरमध्ये महेला जयवर्धने, कुलसेकरा आणि परेराने फटकेबाजी करत लंकेला दमदार स्कोर उभा करुन दिला. महेला जयवर्धनेनं शानदार सेंच्युरी ठोकली. अवघ्या 88 बॉलमध्ये त्याने तब्बल 13 फोर मारत नॉटआऊट 103 रन्स केले. तर थिसारा परेरा 22 रन्सवर नॉटआऊट राहिला. भारतातर्फे झहीर खान आणि युवराज सिंगनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2011 04:18 PM IST

लंकादहनास यंगब्रिगेडची आगेकूच

02 एप्रिल

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कपची मेगाफायनल सुरु आहे. भारताने 3 विकेट गमावत 200 रन्सचा टप्पा केला. श्रीलंकेने विजयासाठी भारतासमोर 275 रन्सचं आव्हान ठेवलंय. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेले वीरेंद्र सेहवाग शुन्यावर तर सचिन 18 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीने इनिंग सावरली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 83 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. पण दिलशानने कोहलीला आउट करत ही जोडी फोडली. कोहली 35 रन्सवर आऊट झाला. गंभीरने मात्र आपली हाफसेंच्युरी पूर्ण केली. याबरोबरच त्यानं वन डे करियरमध्ये 4 हजार रन्सचा टप्पाही पार केला. गंभीरच्या जोडीला आलेल्या कर्णधार धोणीने भक्कम साथ देत निर्णायक आपल्या हाफसेंचुरी सोबत 50 धावाचं योगदान दिलं. भारताला विजयासाठी आणखी 77रन्सची गरज आहे.

दरम्यान पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं विजयासाठी भारतासमोर 275 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 11 ओव्हरमध्ये 50 रन्सचा टप्पा पार केला आहे. सेहवाग शुन्यवर तर सचिन 18 रन्सवर झटपट आउट झाले. पण गंभीर आणि विराटने भारताची इनिंग सावरली आहे. दरम्यान अखेरच्या ओव्हरमध्ये महेला जयवर्धने, कुलसेकरा आणि परेराने फटकेबाजी करत लंकेला दमदार स्कोर उभा करुन दिला. महेला जयवर्धनेनं शानदार सेंच्युरी ठोकली. अवघ्या 88 बॉलमध्ये त्याने तब्बल 13 फोर मारत नॉटआऊट 103 रन्स केले. तर थिसारा परेरा 22 रन्सवर नॉटआऊट राहिला. भारतातर्फे झहीर खान आणि युवराज सिंगनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2011 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close