S M L

अखेर जग जिंकलं !

 02 एप्रिल तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतानं क्रिकेटच्या विश्वविजेतेपदावर सुवर्ण अक्षरात आपलं नाव कोरलं आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर आज विजयाची गुढी उभारली. धोणीनं विजयी सिक्सर ठोकत भारताच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. कॅप्टन धोणीच ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार. तर मॅन ऑफ द वर्ल्ड कप म्हणून युवराजची निवड करण्यात आली. 121 कोटी भारतीयांच स्वप्न कॅप्टन धोणीच्या टीमनं साकार केलंय. इतकचं नव्हे तर भारतीय क्रिकटे टीमने आपल्या लाडक्या सचिनचंही वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केलं.  तब्बल 28 वर्षांनी भारताने हा वर्ल्डकप जिंकला आहे. 1983 साली कपिल देवनं भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून दिला होता. लंकेच्या 275 रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात काहीशी अडखळती झाली होती. सेहवाग आणि सचिन झटपट आउट झाल्यानंतर आलेल्या गंभीर आणि कोहलीने टीम इंडियाला सावरण्याचा चांगलाच प्रयत्न केला. या दोघांची संयमी खेळी सुरु असतानाच कोहली कॅच आऊट झाला.  त्यानंतर आलेल्या धोणीने गंभीरला दमदार साथ देत संघाची धावसंख्या दोनशेच्यापुढे नेऊन ठेवली. गंभीर सेंच्युरीच्याजवळ पोहोचला असतानाच आऊट झाला. त्यानंतर आलेल्या युवराज सिंगसोबत कॅप्टन धोणीनं मग मिशन वर्ल्डकप पूर्ण केला. विजयानंतर टीम इंडियानं मैदानाला फेरी मारुन विजयी सलामी दिली. त्याच्याआधी 1983 नंतर जिंकलेल्या या वर्ल्डकपचा आनंद साजरा करताना टीम इंडिया अक्षरशः भावनावश झाल्याचं पाहायला मिळाली.   श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. लंकेची सुरूवात अडखळत झाली भारतीय टीमनं भेदक बॉलिंगचा सामना करत श्रीलंकन टीमने आता 40व्या ओव्हरनंतरा पाच महत्त्वाच्या विकेट गमावल्या. ओपनिंगला आलेल्या उपुल थरंगाला झहीर खाननं झटपट आऊट केलं. तर धोकादायक ठरणार्‍या तिलकरत्ने दिलशानला हरभजन सिंगनं क्लिन बोल्ड केलं.  दिलशान 33 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर महेला जयवर्धने आणि संगकारा या आजी माजी कॅप्टनच्या जोडीने हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली खरी पण हरभजनने संगकाराला आउट  केलं आणि पव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर आलेल्या युवराज सिंगने आपल्या बॉलिंगवर थिलन समराविराला एलबीडब्लु आउट केलं. युवराज सिंगनं आता पर्यंत दोन विकेट घेतल्या आहे. लंकनं टीमची इंनिग सांभळण्यासाठी आलेल्या कपुगेटरा आणि कुलशेखरा हे क्रमाने आउट झाले. अखेर महेला जयवर्धनने 103 रन्सच्या शतकी खेळीवर भारतचाला 275 रन्सचं टार्गेट दिलं.  श्रीलंकेने विजयासाठी भारतासमोर 275 रन्सचं आव्हान ठेवलंय. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेले वीरेंद्र सेहवाग शुन्यावर तर सचिन 18 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीने इनिंग सावरली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 83 रन्सची दमदार पार्टनरशिप केली.  पण दिलशानने कोहलीला आउट करत ही जोडी फोडली. कोहली 35 रन्सवर आऊट झाला. गंभीरने मात्र आपली हाफसेंच्युरी पूर्ण केली. याबरोबरच त्यानं वन डे करिअरमध्ये 4 हजार रन्सचा टप्पाही पार केला. गंभीर 97 रन्सवर आउट झाला. त्याने 122 चेंडूचा सामना करत 9 चौकाराच्या साह्याने 97 रन्सपूर्ण केले.  भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने कर्णधाराला साजेशी बॅटिंग करून भारतला विजय मिळवून दिला. त्याने 79 चेंडूचा सामनाकरत 91 धावा ठोकल्या यात 8 चौकार आणि 2षटकारांचा समावेश आहे. धोणी साथ दिली ती युवराज सिंगने. युवराजने ही नाबाद खेळीकरत 21 धावा केल्या.  टॉस का बॉस  वर्ल्ड कप फायनलपूर्वी टॉसच्या वेळी एक गंमत घडली. भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने टॉससाठी नाणं उडवलं. पण फॅन्सच्या प्रचंड आवाजामुळे संगकारा हेड्स म्हणाला की टेल्स हे धोणीला ऐकूच गेलं नाही. त्यामुळे टॉस नक्की कोणी जिंकला हे दोनेही कॅप्टनना कळेना.  दोघं एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. अखेर मॅच रेफरी जेफ क्रो यांनी टॉस पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. आणि यावेळी मात्र संगकाराने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. वानखेडे स्टेडि/म अर्थातच हाऊसफुल झालंय. त्यामुळे प्रेक्षकांचा जल्लोष मैदानावर पाहायला मिळतोय.   

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2011 05:22 PM IST

अखेर जग जिंकलं !

 02 एप्रिल

 

तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतानं क्रिकेटच्या विश्वविजेतेपदावर सुवर्ण अक्षरात आपलं नाव कोरलं आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर आज विजयाची गुढी उभारली. धोणीनं विजयी सिक्सर ठोकत भारताच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. कॅप्टन धोणीच ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार. तर मॅन ऑफ द वर्ल्ड कप म्हणून युवराजची निवड करण्यात आली. 121 कोटी भारतीयांच स्वप्न कॅप्टन धोणीच्या टीमनं साकार केलंय. इतकचं नव्हे तर भारतीय क्रिकटे टीमने आपल्या लाडक्या सचिनचंही वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केलं.

 

तब्बल 28 वर्षांनी भारताने हा वर्ल्डकप जिंकला आहे. 1983 साली कपिल देवनं भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून दिला होता. लंकेच्या 275 रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात काहीशी अडखळती झाली होती. सेहवाग आणि सचिन झटपट आउट झाल्यानंतर आलेल्या गंभीर आणि कोहलीने टीम इंडियाला सावरण्याचा चांगलाच प्रयत्न केला. या दोघांची संयमी खेळी सुरु असतानाच कोहली कॅच आऊट झाला.

 

त्यानंतर आलेल्या धोणीने गंभीरला दमदार साथ देत संघाची धावसंख्या दोनशेच्यापुढे नेऊन ठेवली. गंभीर सेंच्युरीच्याजवळ पोहोचला असतानाच आऊट झाला. त्यानंतर आलेल्या युवराज सिंगसोबत कॅप्टन धोणीनं मग मिशन वर्ल्डकप पूर्ण केला. विजयानंतर टीम इंडियानं मैदानाला फेरी मारुन विजयी सलामी दिली. त्याच्याआधी 1983 नंतर जिंकलेल्या या वर्ल्डकपचा आनंद साजरा करताना टीम इंडिया अक्षरशः भावनावश झाल्याचं पाहायला मिळाली. 

 

श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. लंकेची सुरूवात अडखळत झाली भारतीय टीमनं भेदक बॉलिंगचा सामना करत श्रीलंकन टीमने आता 40व्या ओव्हरनंतरा पाच महत्त्वाच्या विकेट गमावल्या. ओपनिंगला आलेल्या उपुल थरंगाला झहीर खाननं झटपट आऊट केलं. तर धोकादायक ठरणार्‍या तिलकरत्ने दिलशानला हरभजन सिंगनं क्लिन बोल्ड केलं.

 

दिलशान 33 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर महेला जयवर्धने आणि संगकारा या आजी माजी कॅप्टनच्या जोडीने हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली खरी पण हरभजनने संगकाराला आउट  केलं आणि पव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर आलेल्या युवराज सिंगने आपल्या बॉलिंगवर थिलन समराविराला एलबीडब्लु आउट केलं. युवराज सिंगनं आता पर्यंत दोन विकेट घेतल्या आहे. लंकनं टीमची इंनिग सांभळण्यासाठी आलेल्या कपुगेटरा आणि कुलशेखरा हे क्रमाने आउट झाले. अखेर महेला जयवर्धनने 103 रन्सच्या शतकी खेळीवर भारतचाला 275 रन्सचं टार्गेट दिलं.

 

श्रीलंकेने विजयासाठी भारतासमोर 275 रन्सचं आव्हान ठेवलंय. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेले वीरेंद्र सेहवाग शुन्यावर तर सचिन 18 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीने इनिंग सावरली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 83 रन्सची दमदार पार्टनरशिप केली.

 

पण दिलशानने कोहलीला आउट करत ही जोडी फोडली. कोहली 35 रन्सवर आऊट झाला. गंभीरने मात्र आपली हाफसेंच्युरी पूर्ण केली. याबरोबरच त्यानं वन डे करिअरमध्ये 4 हजार रन्सचा टप्पाही पार केला. गंभीर 97 रन्सवर आउट झाला. त्याने 122 चेंडूचा सामना करत 9 चौकाराच्या साह्याने 97 रन्सपूर्ण केले.

 

भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने कर्णधाराला साजेशी बॅटिंग करून भारतला विजय मिळवून दिला. त्याने 79 चेंडूचा सामनाकरत 91 धावा ठोकल्या यात 8 चौकार आणि 2षटकारांचा समावेश आहे. धोणी साथ दिली ती युवराज सिंगने. युवराजने ही नाबाद खेळीकरत 21 धावा केल्या.

 

टॉस का बॉस

 

वर्ल्ड कप फायनलपूर्वी टॉसच्या वेळी एक गंमत घडली. भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने टॉससाठी नाणं उडवलं. पण फॅन्सच्या प्रचंड आवाजामुळे संगकारा हेड्स म्हणाला की टेल्स हे धोणीला ऐकूच गेलं नाही. त्यामुळे टॉस नक्की कोणी जिंकला हे दोनेही कॅप्टनना कळेना.

 

दोघं एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. अखेर मॅच रेफरी जेफ क्रो यांनी टॉस पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. आणि यावेळी मात्र संगकाराने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. वानखेडे स्टेडि/म अर्थातच हाऊसफुल झालंय. त्यामुळे प्रेक्षकांचा जल्लोष मैदानावर पाहायला मिळतोय.  

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close