S M L

पाँटिंगच्या कॅप्टन्स डायरीमुळे नव्या वादाला तोंड

08 नोव्हेंबर ,गेल्यावर्षी भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया दौ-यातली सिडने टेस्ट क्रिकेटपेक्षा गाजली ती हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यातल्या वादामुळे. दोन्ही टीम्समधले संबंध या प्रकरणात दुखावले. हे प्रकरण होऊन वर्ष उलटलं, तरी या पडसाद अधूनमधून दोन्ही टीम्सच्या मैदानावरच्या वागणुकीत उमटतात. त्यात आता भर टाकली आहे ती ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पाँटिंगच्या एका लेखामुळे. पाँटिंगने कॅप्टन्स डायरी 2008 मध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. आणि ऑस्ट्रेलियन टीमने हरभजनविरुद्धची लेखी तक्रार मागे घ्यावी अशी विनंती एका सिनिअर भारतीय खेळाडूने आपल्याला केली होती असा गौप्यस्फोट केला आहे. या डायरीत पाँटिंग म्हणतो, आम्ही तक्रार केल्यानंतर दुस-याच दिवशी भारतीय टीममधल्या एका सिनिअर खेळाडूशी माझं फोनवर बोलणं झालं. त्याने थेट मुद्याला हात घालत मला तक्रार मागे घ्यायची विनंती केली. आम्ही गप्प का बसावं असा प्रश्न मी त्याला केला. यावर उत्तर देताना हरभजनची चूक आहे किंवा नाही यावर बोलणं सोडून पुढच्या निर्णय प्रक्रियेवर तो बोलत बसला. पुढची प्रक्रिया वेळखाऊ आहे. आणि दोन्ही टीम्ससाठी ही वेळ खडतर असेल, असं त्याने मला सुनावलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2008 04:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2008 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close