S M L

जिवनातील सर्वात अभिमानास्पद क्षण - सचिन

02 एप्रिल"जिवनातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे. मला माझे अश्रू रोखता येत नाही हे आनदांचे अश्रू आहेत. मी या टीमचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. गॅरी कर्स्टनचा या विजयात मोलाचा वाटा आहे. आम्ही टीम म्हणून काम केलं" अशी भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांने व्यक्त केली.तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतानं क्रिकेटच्या विश्वविजेतेपदावर सुवर्ण अक्षरात आपलं नाव कोरलं आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर आज विजयाची गुढी उभारली. धोणीनं विजयी सिक्सर ठोकत भारताच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. कॅप्टन धोणीच ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार. तर मॅन ऑफ द वर्ल्ड कप म्हणून युवराजची निवड करण्यात आली. 125 कोटी भारतीयांच स्वप्न कॅप्टन धोणीच्या टीमनं साकार केलंय. इतकचं नव्हे तर भारतीय क्रिकटे टीमने आपल्या लाडक्या सचिनचंही वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2011 07:36 PM IST

जिवनातील सर्वात अभिमानास्पद क्षण - सचिन

02 एप्रिल

"जिवनातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे. मला माझे अश्रू रोखता येत नाही हे आनदांचे अश्रू आहेत. मी या टीमचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. गॅरी कर्स्टनचा या विजयात मोलाचा वाटा आहे. आम्ही टीम म्हणून काम केलं" अशी भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांने व्यक्त केली.

तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतानं क्रिकेटच्या विश्वविजेतेपदावर सुवर्ण अक्षरात आपलं नाव कोरलं आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर आज विजयाची गुढी उभारली. धोणीनं विजयी सिक्सर ठोकत भारताच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. कॅप्टन धोणीच ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार. तर मॅन ऑफ द वर्ल्ड कप म्हणून युवराजची निवड करण्यात आली. 125 कोटी भारतीयांच स्वप्न कॅप्टन धोणीच्या टीमनं साकार केलंय. इतकचं नव्हे तर भारतीय क्रिकटे टीमने आपल्या लाडक्या सचिनचंही वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2011 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close