S M L

आसाममध्ये पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान

04 एप्रिलआसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील जवळपास 70 टक्के इतकं उच्चांकी मतदान झाले. विधानसभेच्या 126 जागांपैकी 62 जागांसाठी मतदानाचा पहिला टप्पा झाला. दुसर्‍या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनण्याची आशा काँग्रेसच्या तरुण गोगोई यांना आहे. पण सरकारविरोधी लाटेचा फटका काँग्रेसला बसू शकतो. विरोधी आसाम गण परिषदेने भाजपला सोबत न घेता निवडणूक लढवली. पण निवडणुकीनंतर त्यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. तर उल्फाने या निवडणुकीत भाग घेतला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 05:02 PM IST

आसाममध्ये पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान

04 एप्रिल

आसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील जवळपास 70 टक्के इतकं उच्चांकी मतदान झाले. विधानसभेच्या 126 जागांपैकी 62 जागांसाठी मतदानाचा पहिला टप्पा झाला. दुसर्‍या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनण्याची आशा काँग्रेसच्या तरुण गोगोई यांना आहे. पण सरकारविरोधी लाटेचा फटका काँग्रेसला बसू शकतो. विरोधी आसाम गण परिषदेने भाजपला सोबत न घेता निवडणूक लढवली. पण निवडणुकीनंतर त्यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. तर उल्फाने या निवडणुकीत भाग घेतला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close