S M L

गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती जास्त !

05 एप्रिलगिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती बाबतचा प्रश्न येत्या महिनाभरात मुख्यमंत्री आणि गिरणी कामगारांच्या नेत्यांबरोबर चर्चा करून सोडवू असं आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेत दिलं. नीलम गोर्‍हे यांनी ही सूचना मांडली होती. म्हाडाने नुकत्याच झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांसाठी साडेबारा लाख इतकी किंमत जाहीर केली होती. ही किंमत जास्त असल्याचे राज्य सरकारलाही वाटते अशी कबुलीही सचिन अहिर यांनी दिली. येत्या दिवाळीपर्यंत या घरांचे वाटप सुरू होईल, असंही अहिर आपल्या उत्तरात म्हणाले. गेल्या आठवड्यात घरांच्या किंमती कमी करण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगारांनी मुंबईतल्या सीएसटी इथं रास्ता रोको करत आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 02:40 PM IST

गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती जास्त !

05 एप्रिल

गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती बाबतचा प्रश्न येत्या महिनाभरात मुख्यमंत्री आणि गिरणी कामगारांच्या नेत्यांबरोबर चर्चा करून सोडवू असं आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेत दिलं. नीलम गोर्‍हे यांनी ही सूचना मांडली होती. म्हाडाने नुकत्याच झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांसाठी साडेबारा लाख इतकी किंमत जाहीर केली होती. ही किंमत जास्त असल्याचे राज्य सरकारलाही वाटते अशी कबुलीही सचिन अहिर यांनी दिली. येत्या दिवाळीपर्यंत या घरांचे वाटप सुरू होईल, असंही अहिर आपल्या उत्तरात म्हणाले. गेल्या आठवड्यात घरांच्या किंमती कमी करण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगारांनी मुंबईतल्या सीएसटी इथं रास्ता रोको करत आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close