S M L

मेट्रो प्रकल्पाची किंमत अव्वाच्या सव्वा; आ.सिद्दीकींचा सरकारला घरचा आहेर

05 एप्रिलमुंबईत होणार्‍या मेट्रो रेल प्रकल्पाच्या किंमतीवरून राज्य सरकार अडचणीत आलंय. या प्रकल्पाच्या अवास्तव वाढलेल्या किंमतीबद्दल सरकारवर थेट टीका केली ती काँग्रेसचेच आमदार असलेल्या बाबा सिद्दीकी यांनी. आज मंगळवारी विधानसभेत नगरविकास खात्याच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बोलताना काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकी यांनी मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाची किंमत अवास्तव वाढली असा आरोप केला. मुंबईत या प्रकल्पाचे काम रिलायन्स या कंपनीला देण्यात आलंय. रिलायन्सलाच हैदराबादच्याही मेट्रोचे काम दिले आहेत. हैदराबादचे काम 171 कोटीं प्रति किलोमीटरना मंजूर झालंय तर त्यानंतर केवळ महिन्याभरातच मंजूर झालेल्या मुंबईतील प्रकल्पाची प्रति किमी किंमत आहे तब्बल 354 कोटी रुपये. त्यामुळे या प्रकल्पाची एकूण किंमत 5950 कोटी रूपयांनी वाढली आहे. म्हणूनच या पूर्ण टेंडरची चौकशी करावी अशी मागणी बाबा सिद्दीकी यांनी केली. विशेष म्हणजे एमएमआरडीए हे खातं असताना काँग्रेसच्याच आमदाराने त्यावर टीका करणे याबाबत विधानभवनात चर्चा सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 03:21 PM IST

मेट्रो प्रकल्पाची किंमत अव्वाच्या सव्वा; आ.सिद्दीकींचा सरकारला घरचा आहेर

05 एप्रिल

मुंबईत होणार्‍या मेट्रो रेल प्रकल्पाच्या किंमतीवरून राज्य सरकार अडचणीत आलंय. या प्रकल्पाच्या अवास्तव वाढलेल्या किंमतीबद्दल सरकारवर थेट टीका केली ती काँग्रेसचेच आमदार असलेल्या बाबा सिद्दीकी यांनी. आज मंगळवारी विधानसभेत नगरविकास खात्याच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बोलताना काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकी यांनी मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाची किंमत अवास्तव वाढली असा आरोप केला.

मुंबईत या प्रकल्पाचे काम रिलायन्स या कंपनीला देण्यात आलंय. रिलायन्सलाच हैदराबादच्याही मेट्रोचे काम दिले आहेत. हैदराबादचे काम 171 कोटीं प्रति किलोमीटरना मंजूर झालंय तर त्यानंतर केवळ महिन्याभरातच मंजूर झालेल्या मुंबईतील प्रकल्पाची प्रति किमी किंमत आहे तब्बल 354 कोटी रुपये. त्यामुळे या प्रकल्पाची एकूण किंमत 5950 कोटी रूपयांनी वाढली आहे.

म्हणूनच या पूर्ण टेंडरची चौकशी करावी अशी मागणी बाबा सिद्दीकी यांनी केली. विशेष म्हणजे एमएमआरडीए हे खातं असताना काँग्रेसच्याच आमदाराने त्यावर टीका करणे याबाबत विधानभवनात चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close