S M L

मैत्रीणीचा विनयभंग करणार्‍या 'इंटरनेट रोमिओ'ला अटक

05 एप्रिलइंटरनेटवर चॅटिंग करताना ओळख झालेल्या 20 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सलील भालचंद्र नानल या 41 वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नानलने फेसबुकवर बोगस आय.डी तयार करून संबंधित तरूणीचा बदनामीकारक मजकूरही पोस्ट केल्याचं उघड झालंय. या दोघांची सहा वर्षांपूर्वी इंटरनेट चॅटिंग करताना ओळख झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांचं बोलणं सुरू झालं. पण आई रागावल्यामुळे तिनं बोलणं बंद केलं. यामुळे चिडलेल्या सलीलने या तरुणीला धमकावयला सुरवात केली. 2008 मध्येही पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी दोघांचे काऊन्स्लिींगही करण्यात आलं होतं. पण पुन्हा काही दिवसांनी त्रास सुरू झाला. काही महिन्यांपूर्वी तरूणीला भेटायला बोलावलं आणि तिचा विनयभंग केला. अखेर पोलिसांनी सलील नानलला अटक केली. त्याच्यावर विनयभंगाचा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 04:39 PM IST

मैत्रीणीचा विनयभंग करणार्‍या 'इंटरनेट रोमिओ'ला अटक

05 एप्रिल

इंटरनेटवर चॅटिंग करताना ओळख झालेल्या 20 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सलील भालचंद्र नानल या 41 वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नानलने फेसबुकवर बोगस आय.डी तयार करून संबंधित तरूणीचा बदनामीकारक मजकूरही पोस्ट केल्याचं उघड झालंय. या दोघांची सहा वर्षांपूर्वी इंटरनेट चॅटिंग करताना ओळख झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांचं बोलणं सुरू झालं.

पण आई रागावल्यामुळे तिनं बोलणं बंद केलं. यामुळे चिडलेल्या सलीलने या तरुणीला धमकावयला सुरवात केली. 2008 मध्येही पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी दोघांचे काऊन्स्लिींगही करण्यात आलं होतं. पण पुन्हा काही दिवसांनी त्रास सुरू झाला. काही महिन्यांपूर्वी तरूणीला भेटायला बोलावलं आणि तिचा विनयभंग केला. अखेर पोलिसांनी सलील नानलला अटक केली. त्याच्यावर विनयभंगाचा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close