S M L

मराठी-अमराठी वादाचा खेळाडूंवर परिणाम नाही

9 नोव्हेंबर, मुंबईऋजुता सटवेसंगीत, कला आणि खेळाला भौगोलिक सीमा नसतात असं म्हटलं जातं. खरं म्हणजे संगीत, खेळ या गोष्टी वेगवेगळया देशातल्या,प्रांतातल्या लोकांना एकत्र आणतात. बॅडमिंटनपटू जीष्णू सन्याल आणि अक्षय देवलकर यांच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. सध्या ही जोडी बॅडमिंटनमध्ये भारताची आघाडीची जोडी बनली आहे.कोलकात्यात बॅडमिंटनच्या पुरेशा सुविधा नाहीत म्हणून चार वर्षांपूर्वी जीष्णू मुंबईत आला. लवकरच त्यांची जोडी जमली.आता तर यावर्षीपासून एकत्र डबल्स खेळण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. खेळासाठी पाच वर्षं मुंबईत राहिल्यावर मुंबईविषयी जीष्णूला प्रचंड प्रेम आहे. ' फक्त 15 वर्षांचा असताना मी मुंबईत आलो. खर्‍या अर्थानं मुंबई माझं घर आहे ', असं तो म्हणतो.दोघांचा खेळ एकमेकांना पूरक असल्यानं बॅडमिंटन कोर्टवर त्यांची जोडी छान जमलीय. आणि कोर्ट बाहेर त्यांच्यातलं नातं आहे ते निखळ मैत्रीचं. राष्ट्रीय स्तरावर ही जोडी यावर्षी आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही दोघं एकत्र खेळले आहेत. बॅडमिंटनमध्ये डबल्स खेळताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समन्वय. त्यामुळेच दोघांची भाषा वेगळी असली तरी त्याचा अडसर त्यांना खेळताना कधी आला नाही. आणि आता त्यांचं लक्ष्य आहे ते महाराष्ट्राला नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून देण्याचं.जीष्णू आणि अक्षय सध्या ज्येष्ठ बॅडमिंटन कोच श्रीकांत वाड यांच्याकडे प्रशिक्षण घेतायत. वाड सराच्यां बॅडमिंटन अकॉडमीत जीष्णू एकटाच नाही तर महाराष्ट्राबोहेरुन आलेले आठ खेळाडू आहेत. ' बाहेरचे खेळाडू आले की स्थानिकांची संधी हिरावली जाते, असं ममळीच नाही. उलट चांगल्या दर्जाच्या खेळाडूंबरोबर सराव केल्यानं स्थानिक खेळाडूंच्या खेळाचाही दर्जा उंचावतो. ' असं श्रीकांत वाड यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2008 05:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2008 05:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close