S M L

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी राहुल शेवाळेंची निवड

06 एप्रिलमुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अखेर शिवसेनेच्याच हाती गेल्या. अपेक्षेप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांची निवड झाली. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे विनोद घेडिया यांची निवड झाली. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीसाठी आज मतदान झालं. यामध्ये राहुल शेवाळे यांना 14 तर राष्ट्रवादीच्या नियाज वनू यांना 11 मतं मिळाली. दरम्यान अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका वंदना गवळी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने 3 कोटी रुपये लाच देऊन फोडण्याचा प्रयत्न केला. यामागे राष्ट्रवादीच्या एका मोठ्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2011 10:14 AM IST

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी राहुल शेवाळेंची निवड

06 एप्रिल

मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अखेर शिवसेनेच्याच हाती गेल्या. अपेक्षेप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांची निवड झाली. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे विनोद घेडिया यांची निवड झाली. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीसाठी आज मतदान झालं. यामध्ये राहुल शेवाळे यांना 14 तर राष्ट्रवादीच्या नियाज वनू यांना 11 मतं मिळाली. दरम्यान अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका वंदना गवळी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने 3 कोटी रुपये लाच देऊन फोडण्याचा प्रयत्न केला. यामागे राष्ट्रवादीच्या एका मोठ्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2011 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close