S M L

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक या अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न

07 एप्रिलअंधश्रद्धा निर्मूलन विधेयक या अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उत्तर देतांना दिली. आजच्या कॅबिनेट बैठकीत या विधेयकाच्या सुधारीत मसुद्याबद्दल मान्यता देण्यात येईल. या विधेयकातून वारकरी संप्रदायाला वगळल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. दुसरीकडे भोदूबांबाच्या जाहिराती देणार्‍यांविरुध्द कडक कारवाई केली जाणार असल्याच गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.जर हे विधेयक अधिवेशनात आणू शकलो नाहीत तर अध्याध्येश काढून पावसाळी अधिवेशनात ते बील मंजूर करुन घेणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. या विधेयकातून वारकरी संप्रदायाला वगळलं आहे. मात्र भोंदुगिरी करणार्‍यांवर कडक कारवाई करणारे हे बिल असल्याचं ही अजित पवारांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2011 10:07 AM IST

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक या अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न

07 एप्रिल

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक या अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उत्तर देतांना दिली. आजच्या कॅबिनेट बैठकीत या विधेयकाच्या सुधारीत मसुद्याबद्दल मान्यता देण्यात येईल. या विधेयकातून वारकरी संप्रदायाला वगळल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. दुसरीकडे भोदूबांबाच्या जाहिराती देणार्‍यांविरुध्द कडक कारवाई केली जाणार असल्याच गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

जर हे विधेयक अधिवेशनात आणू शकलो नाहीत तर अध्याध्येश काढून पावसाळी अधिवेशनात ते बील मंजूर करुन घेणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. या विधेयकातून वारकरी संप्रदायाला वगळलं आहे. मात्र भोंदुगिरी करणार्‍यांवर कडक कारवाई करणारे हे बिल असल्याचं ही अजित पवारांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2011 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close