S M L

आयपीएलचा हंगाम !

07 एप्रिलवर्ल्ड कप स्पर्धेनंतर केवळ पाच दिवसांनीच इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवात होते आहे. आयपीएलचा हा चौथा हंगाम असून यंदा तब्बल दहा टीम सहभागी झाल्या आहेत. पण वर्ल्ड कप नंतर लगेचच ही स्पर्धा होत असल्याने आयपीएलला कितपत यश मिळतंय याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आणि विशेष म्हणजे यंदाची आयपीएल स्पर्धा ललित मोदींशिवाय पार पडणार आहे. वर्ल्ड कप जिंकून वर्ल्डचॅम्प भारतीय टीमच्या खर्‍या हिरोंनी आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण साजरा केला. हा विश्वविजय म्हणजे सांघिक विजयाचं प्रतिक होतं. पण विजयाचा हा क्षण खेळाडूंना फार काळ एन्जॉय करता येणार नाही. कारण लगेचच आयीएलला सुरुवात होत आहे.अर्थात खेळाडूंसाठी ही बाब उस्ताहवर्धक नक्कीच नाही.तर आयपीएलसाठी टीमची बांधणी करायला फ्रेंचायईजींनाही खुपच थोडा अवधी मिळाला. काहींनी आधीपासूनच सुरूवात केली होती. पण एक मात्र नक्की गेल्या आयपीएलइतका यंदा फिव्हर नाही. विराट कोहली म्हणतो की, आम्हाला सेलिब्रेशनसाठी आणखी थोडा अवधी मिळायला हवा होता. पण ठिक आहे तुम्ही जितकं जास्त क्रिकेट खेळाल तितकाच खेळावर जास्त फोकस होईल.अतिक्रिकेटमुळे काही प्रमुख खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच आयपीएल पाठोपाठ भारतीय टीम लगेचचं वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन टीम्स वाढल्या आहेत. टीममध्ये अनेक बदल झाल्यामुळे ही स्पर्धा चांगलीच रंगणार हे नक्की. टीमच्या मालकांसाठी ही नक्कीच खुशखबर असेल. अब्जोवधी रुपयांच्या या आयपीएल स्पर्धेला आणि ग्लॅमरस मालकांच्या या क्रिकेटेंनटेंमेंटला वर्ल्ड कपनंतर क्रिकेटप्रेमी किती पसंती देतील हे लवकरच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2011 06:31 PM IST

आयपीएलचा हंगाम !

07 एप्रिल

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर केवळ पाच दिवसांनीच इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवात होते आहे. आयपीएलचा हा चौथा हंगाम असून यंदा तब्बल दहा टीम सहभागी झाल्या आहेत. पण वर्ल्ड कप नंतर लगेचच ही स्पर्धा होत असल्याने आयपीएलला कितपत यश मिळतंय याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आणि विशेष म्हणजे यंदाची आयपीएल स्पर्धा ललित मोदींशिवाय पार पडणार आहे.

वर्ल्ड कप जिंकून वर्ल्डचॅम्प भारतीय टीमच्या खर्‍या हिरोंनी आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण साजरा केला. हा विश्वविजय म्हणजे सांघिक विजयाचं प्रतिक होतं. पण विजयाचा हा क्षण खेळाडूंना फार काळ एन्जॉय करता येणार नाही. कारण लगेचच आयीएलला सुरुवात होत आहे.अर्थात खेळाडूंसाठी ही बाब उस्ताहवर्धक नक्कीच नाही.

तर आयपीएलसाठी टीमची बांधणी करायला फ्रेंचायईजींनाही खुपच थोडा अवधी मिळाला. काहींनी आधीपासूनच सुरूवात केली होती. पण एक मात्र नक्की गेल्या आयपीएलइतका यंदा फिव्हर नाही. विराट कोहली म्हणतो की, आम्हाला सेलिब्रेशनसाठी आणखी थोडा अवधी मिळायला हवा होता. पण ठिक आहे तुम्ही जितकं जास्त क्रिकेट खेळाल तितकाच खेळावर जास्त फोकस होईल.

अतिक्रिकेटमुळे काही प्रमुख खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच आयपीएल पाठोपाठ भारतीय टीम लगेचचं वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन टीम्स वाढल्या आहेत. टीममध्ये अनेक बदल झाल्यामुळे ही स्पर्धा चांगलीच रंगणार हे नक्की. टीमच्या मालकांसाठी ही नक्कीच खुशखबर असेल. अब्जोवधी रुपयांच्या या आयपीएल स्पर्धेला आणि ग्लॅमरस मालकांच्या या क्रिकेटेंनटेंमेंटला वर्ल्ड कपनंतर क्रिकेटप्रेमी किती पसंती देतील हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2011 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close