S M L

रविवारी अंतिम निर्णय घेणार !

दि. 8 एप्रिल, दिल्लीसरकार सोबत झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतरही सरकारच्या प्रस्तावात त्रुटी आहेत, त्यामुळे रविवारी अंतिम निर्णय घेणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. सलग पाचव्या दिवशीही हे उपोषण सुरु ठेवणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय. शुक्रवारी संध्याकाळी सरकार आणि अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. सकारात्मक निर्णय झाल्याचे संकेत या चर्चेत सहभागी झालेल्या स्वामी अग्निवेश आणि अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. कपिल सिब्बल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर ही चर्चा संपल्याची घोषणा स्वामी अग्निवेश यांनी केली. सरकारनं आम्हाला नवीन मुसदा दिलाय आणि यावरचा अंतिम निर्णय अण्णा हजारे घेणार आहेत. पण तो निर्णय चांगला असेल असंही स्वामी अग्निवेश यांनी सांगितलंय. लोकपाल विधेयकासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत नवा मसुदा सरकारनं दिल्याची माहिती स्वामी अग्निवेश यांनी दिली. याबाबतचा अंतिम निर्णय अण्णा हजारे जाहीर करणार आहेत. संयुक्त समितीत दोन अध्यक्ष असावेत, त्यापैकी एक मंत्री आणि दुसरा समाजाचा प्रतिनिधी असावा अशी आंदोलकांची मागणी होती. तसंच या समितीच्या स्थापनेबाबत सरकारनं अधिसूचना जारी करावी, असाही त्यांचा आग्रह होता. या दोन्ही मागण्या सरकारनं मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 05:31 PM IST

रविवारी अंतिम निर्णय घेणार !

दि. 8 एप्रिल, दिल्ली

सरकार सोबत झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतरही सरकारच्या प्रस्तावात त्रुटी आहेत, त्यामुळे रविवारी अंतिम निर्णय घेणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. सलग पाचव्या दिवशीही हे उपोषण सुरु ठेवणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय.

शुक्रवारी संध्याकाळी सरकार आणि अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. सकारात्मक निर्णय झाल्याचे संकेत या चर्चेत सहभागी झालेल्या स्वामी अग्निवेश आणि अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. कपिल सिब्बल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर ही चर्चा संपल्याची घोषणा स्वामी अग्निवेश यांनी केली. सरकारनं आम्हाला नवीन मुसदा दिलाय आणि यावरचा अंतिम निर्णय अण्णा हजारे घेणार आहेत. पण तो निर्णय चांगला असेल असंही स्वामी अग्निवेश यांनी सांगितलंय.

लोकपाल विधेयकासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत नवा मसुदा सरकारनं दिल्याची माहिती स्वामी अग्निवेश यांनी दिली. याबाबतचा अंतिम निर्णय अण्णा हजारे जाहीर करणार आहेत. संयुक्त समितीत दोन अध्यक्ष असावेत, त्यापैकी एक मंत्री आणि दुसरा समाजाचा प्रतिनिधी असावा अशी आंदोलकांची मागणी होती. तसंच या समितीच्या स्थापनेबाबत सरकारनं अधिसूचना जारी करावी, असाही त्यांचा आग्रह होता. या दोन्ही मागण्या सरकारनं मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close