S M L

बोगस कागदपत्राद्वारे इंग्लंडला जाणा-या 21 प्रवाशांना अटक

09 नोव्हेंबर मुंबई ,बोगस कागदपत्रांच्या साहाय्याने परदेशी जाणा-या 21 प्रवाशांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रवासी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंग्लंडला नोकरी करता निघाले होते. परंतु त्याआधीच त्यांना अटक झाली. सहार पोलिसांच्या ताब्यात असलेले हे 21 प्रवासी नोकरीसाठी मुंबईहून इंग्लंडला निघाले होते. इंग्लंडच्या लँकशायर शहरातील हॉटेल पार्क लेनमध्ये ते कामासाठी जात होते. बोगस व्हिसा आणि वर्क परमीट बनवून इतीहाद एअरवेजने मुंबई ते अबूधाबी आणि अबूधाबी ते इंग्लंड असा यांचा प्रवास होता. या प्रवाशांना इंग्लंड तर जाता आलं नाहीच पण, खोट्या कागदपत्रांमुळे त्यांना जेलची हवा मात्र खावी लागली. नोकरीचं आमिष दाखवून परदेशात मानवी तस्करी करणा-या सात जणांना पोलिसांनी अटक केली खरी , मात्र याचे मुख्य सुत्रधार अजूनही पडद्याआड आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2008 07:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2008 07:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close