S M L

मुंबई इंडियन्सची विजयी सलामी

10 एप्रिलआयपीएलच्या चौथ्या हंगामात मुंबई इंडियन्सनं विजयी सलामी दिली आहे. सचिन तेंडुलकरच्या कॅप्टन इनिंग आणि लसिथ मलिंगाच्या भेदक बॉलिंगच्या जोरावर मुंबई इंडियन्स दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्लीच्या टीमला शंभर रन्सचा आकडाही पार करता आला नाही. लसिथ मलिंगाने निम्मी टीम आउट करत दिल्लीला अवघ्या 95 रन्समध्ये गुंडाळलं. याला उत्तर देताना मुंबई इंडियन्सची सुरुवातही खराब झाली. डेव्हिड जेकब आणि अंबाती रायडू झटपट आउट झाले. पण सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माने मुंबईची इनिंग सावरली. या दोघांनी 68 रन्सची नॉटआउट पार्टनरशिप करत मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सचिन तेंडुलकर 46 तर रोहित शर्मानं नॉटआउट 27 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 02:12 PM IST

मुंबई इंडियन्सची विजयी सलामी

10 एप्रिल

आयपीएलच्या चौथ्या हंगामात मुंबई इंडियन्सनं विजयी सलामी दिली आहे. सचिन तेंडुलकरच्या कॅप्टन इनिंग आणि लसिथ मलिंगाच्या भेदक बॉलिंगच्या जोरावर मुंबई इंडियन्स दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्लीच्या टीमला शंभर रन्सचा आकडाही पार करता आला नाही. लसिथ मलिंगाने निम्मी टीम आउट करत दिल्लीला अवघ्या 95 रन्समध्ये गुंडाळलं. याला उत्तर देताना मुंबई इंडियन्सची सुरुवातही खराब झाली. डेव्हिड जेकब आणि अंबाती रायडू झटपट आउट झाले. पण सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माने मुंबईची इनिंग सावरली. या दोघांनी 68 रन्सची नॉटआउट पार्टनरशिप करत मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सचिन तेंडुलकर 46 तर रोहित शर्मानं नॉटआउट 27 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close