S M L

सिब्बल यांनी राजीनामा द्यावा !

11 एप्रिलमोठ्या मेहनतीने लोकपाल विधेयकाचा मसुदा सर्वांनी तयार केला तो जनहिताचाच आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांचा समितीत राहूनही या विधेयकांमधल्या तरतुदीवर विश्वास नसेल, तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी व्यक्त केली आहे. एक लोकपाल विधेयक काढून काही भ्रष्टाचार थांबणार नाही असं वक्तव्य दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी केलं होतं. त्यावर समितीतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.तसेच भ्रष्टाचाराविरुध्द माझी लढाई सुरुच राहणार आहे सर्वसामान्य जनता माझ्या पाठीमागे ठाम उभी आहे त्यांचं ऋण व्यक्त करत अण्णांनी सिब्बल यांना टीकेचं लक्ष्य केलं. लोकपाल विधेयकावर विश्वास नसेल तर, कपिल सिब्बल यांनी मसुदा समितीतून राजीनामा द्यावा असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय.तर कपिल सिब्बल यांचं विधान बेजबाबदार असल्याचं आरयीआय कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावर माझा राजीनामा कशाला असा सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. विधेयकाचा मसुदा लवकरात लवकर व्हावा असं मलाही वाटतं. मी लवकरच अण्णा यांच्यासोबत या विधेयकावर चर्चा करणार आहे, असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 09:28 AM IST

सिब्बल यांनी राजीनामा द्यावा !

11 एप्रिल

मोठ्या मेहनतीने लोकपाल विधेयकाचा मसुदा सर्वांनी तयार केला तो जनहिताचाच आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांचा समितीत राहूनही या विधेयकांमधल्या तरतुदीवर विश्वास नसेल, तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी व्यक्त केली आहे. एक लोकपाल विधेयक काढून काही भ्रष्टाचार थांबणार नाही असं वक्तव्य दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी केलं होतं. त्यावर समितीतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तसेच भ्रष्टाचाराविरुध्द माझी लढाई सुरुच राहणार आहे सर्वसामान्य जनता माझ्या पाठीमागे ठाम उभी आहे त्यांचं ऋण व्यक्त करत अण्णांनी सिब्बल यांना टीकेचं लक्ष्य केलं. लोकपाल विधेयकावर विश्वास नसेल तर, कपिल सिब्बल यांनी मसुदा समितीतून राजीनामा द्यावा असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

तर कपिल सिब्बल यांचं विधान बेजबाबदार असल्याचं आरयीआय कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावर माझा राजीनामा कशाला असा सवाल कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. विधेयकाचा मसुदा लवकरात लवकर व्हावा असं मलाही वाटतं. मी लवकरच अण्णा यांच्यासोबत या विधेयकावर चर्चा करणार आहे, असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close