S M L

राळेगणसिद्धीत आज साजरा होणार गुढीपाडवा

11 एप्रिललोकपाल विधेयकावरून मतभेद आणि शाब्दिक युद्ध रंगलं असलं तरी इकडे राळेगणसिद्धीमध्ये आज खर्‍या अर्थाने गुढीपाडवा साजरा होतोय.लोकपाल विधेयकाच्या रुपाने दिल्लीची लढाई जिंकल्यानंतर अण्णा हजारे आज संध्याकाळी राळेगणसिध्दीला परतणार आहेत. 4 तारखेला गुढीपाडव्याला राळेगणच्या गावकर्‍यांनी सरकारचा निषेध करत काळ्या गुढ्या उभारल्या होत्या. पण लोकपाल विधेयकाची लढाई जिंकून अण्णा हजारो राळेगणसिद्धीत परतत आहेत. त्यामुळे सडे-रांगोळ्या घालून आणि गुढ्या तोरणे ऊभारून राळेगणसिद्धी गावकर्‍यांनी अण्णांच्या स्वागताची तयारी केली आहेत.तर गावकर्‍यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. राळेगणसिद्धीमध्ये त्यांचं पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात येणार आहे. तब्बल 3 क्विंटल फुलांची ऑर्डर यासाठी देण्यात आली आहे. चैत्रपाडवा आजच साजरा केला जाणार आहे. त्यासाठी गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. लोकाचे तोंड गोड करण्यासाठी 3 क्ंविटल लाडू बनवण्याचे काम सुरु आहे. तसेच 80 ढोलपथकांचा समावेश असलेलं झांजपथक आणि परिसरातील वाद्यवंृदही अण्णांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. राळेगणसिध्दीमध्ये हत्तीवरून साखरही वाटली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 09:57 AM IST

राळेगणसिद्धीत आज साजरा होणार गुढीपाडवा

11 एप्रिल

लोकपाल विधेयकावरून मतभेद आणि शाब्दिक युद्ध रंगलं असलं तरी इकडे राळेगणसिद्धीमध्ये आज खर्‍या अर्थाने गुढीपाडवा साजरा होतोय.लोकपाल विधेयकाच्या रुपाने दिल्लीची लढाई जिंकल्यानंतर अण्णा हजारे आज संध्याकाळी राळेगणसिध्दीला परतणार आहेत. 4 तारखेला गुढीपाडव्याला राळेगणच्या गावकर्‍यांनी सरकारचा निषेध करत काळ्या गुढ्या उभारल्या होत्या. पण लोकपाल विधेयकाची लढाई जिंकून अण्णा हजारो राळेगणसिद्धीत परतत आहेत. त्यामुळे सडे-रांगोळ्या घालून आणि गुढ्या तोरणे ऊभारून राळेगणसिद्धी गावकर्‍यांनी अण्णांच्या स्वागताची तयारी केली आहेत.

तर गावकर्‍यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. राळेगणसिद्धीमध्ये त्यांचं पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात येणार आहे. तब्बल 3 क्विंटल फुलांची ऑर्डर यासाठी देण्यात आली आहे. चैत्रपाडवा आजच साजरा केला जाणार आहे. त्यासाठी गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. लोकाचे तोंड गोड करण्यासाठी 3 क्ंविटल लाडू बनवण्याचे काम सुरु आहे. तसेच 80 ढोलपथकांचा समावेश असलेलं झांजपथक आणि परिसरातील वाद्यवंृदही अण्णांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. राळेगणसिध्दीमध्ये हत्तीवरून साखरही वाटली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close