S M L

जपानमधील भूकंपाला 1 महिना पूर्ण; आज पुन्हा भूकंपाचा धक्का

11 एप्रिलजपानमध्ये आज सोमवारी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 7.1 एवढी नोंद करण्यात आली आहेत. जपानमधील पूर्व आणि ईशान्य भागात भूकंपाचे धक्के जाणवलेत. राजधानी टोकियोपासून 164 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. भूकंपानंतर फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात सावधगिरीचे उपाय म्हणून तिथल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आलंय.सुरुवातीला सुनामीचा इशारा देण्यात आला होता. तो नंतर मागे घेण्यात आला. बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे 11 मार्चला जपानला भूकंपाचा मोठा तडाखा बसला होता. त्यानंतर आलेल्या सुनामीत हजारो लोकांचा मृत्यू झाला. तर हजारो जण बेपत्ता आहेत. या संकटाशी झगडणार्‍या जपानला गेल्या महिन्याभरात हजारो लहानमोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 11:17 AM IST

जपानमधील भूकंपाला 1 महिना पूर्ण; आज पुन्हा भूकंपाचा धक्का

11 एप्रिल

जपानमध्ये आज सोमवारी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 7.1 एवढी नोंद करण्यात आली आहेत. जपानमधील पूर्व आणि ईशान्य भागात भूकंपाचे धक्के जाणवलेत. राजधानी टोकियोपासून 164 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. भूकंपानंतर फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात सावधगिरीचे उपाय म्हणून तिथल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आलंय.

सुरुवातीला सुनामीचा इशारा देण्यात आला होता. तो नंतर मागे घेण्यात आला. बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे 11 मार्चला जपानला भूकंपाचा मोठा तडाखा बसला होता. त्यानंतर आलेल्या सुनामीत हजारो लोकांचा मृत्यू झाला. तर हजारो जण बेपत्ता आहेत. या संकटाशी झगडणार्‍या जपानला गेल्या महिन्याभरात हजारो लहानमोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close