S M L

सिंहगड परिसरात तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला

11 एप्रिलपुण्यात सिंहगड किल्ल्याच्या परिसरात एका तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. या तरुणीची ओळख अजून पटलेली नाही. सिंहगडाकडे जाताना अकरा हजारी पॉईंटच्या रस्त्याच्याकडेला असणार्‍या कठड्याजवळ काल संध्याकाळी हा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड किल्ल्याकडे जाणार्‍या घाटात रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. त्याचं परिसरात एका टपरीच्या शेजारी जळालेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या मुलीचं वय अंदाजे 22 ते 25 वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या ठिकाणी असलेली काळ्या रंगाची चप्पल आणि एक राखाडी रंगाची ओढणी सापडली आहे. प्रेमप्रकरणातून हा खून झालाय का असा संशयही व्यक्त केला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 12:10 PM IST

सिंहगड परिसरात तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला

11 एप्रिल

पुण्यात सिंहगड किल्ल्याच्या परिसरात एका तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. या तरुणीची ओळख अजून पटलेली नाही. सिंहगडाकडे जाताना अकरा हजारी पॉईंटच्या रस्त्याच्याकडेला असणार्‍या कठड्याजवळ काल संध्याकाळी हा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सिंहगड किल्ल्याकडे जाणार्‍या घाटात रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. त्याचं परिसरात एका टपरीच्या शेजारी जळालेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या मुलीचं वय अंदाजे 22 ते 25 वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या ठिकाणी असलेली काळ्या रंगाची चप्पल आणि एक राखाडी रंगाची ओढणी सापडली आहे. प्रेमप्रकरणातून हा खून झालाय का असा संशयही व्यक्त केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close