S M L

उपसरपंचाने केला शेतमजुराच्या मुलीवर 8 दिवस बलात्कार

12 एप्रिलआपल्याकडचं काम सोडल्याचा राग मानून शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर आठ दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील माजलगावात तालुक्यातील राम-पिंपळगाव गावात ही घटना घडली आहे. मुलीचं वय 16 वर्षं आहे. गेल्या रविवारी या मुलीने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात ती 90 टक्के भाजली. सध्या तिच्यावर बीडमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी बाबूलाल रसाळ या सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यासाठी ते रसाळ याच्या शेतात काम करत होते. पैशांची परतफेड झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दुसरीकडे काम करायला सुरुवात केली. त्यामुळे चिडलेल्या रसाळने बदला घ्यायचं ठरवलं. त्यानं शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. आणि तिच्यावर आठ दिवस बलात्कार केला. रसाळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून तो सुरमापुरी गावचा माजी उपसरपंच आहे. त्याचा भाऊ सरपंच आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि नारायण काळे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पण बाबूलाल आणि आणखी दोन जण फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 09:40 AM IST

उपसरपंचाने केला शेतमजुराच्या मुलीवर 8 दिवस बलात्कार

12 एप्रिल

आपल्याकडचं काम सोडल्याचा राग मानून शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर आठ दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील माजलगावात तालुक्यातील राम-पिंपळगाव गावात ही घटना घडली आहे. मुलीचं वय 16 वर्षं आहे. गेल्या रविवारी या मुलीने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात ती 90 टक्के भाजली. सध्या तिच्यावर बीडमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पीडित मुलीच्या वडिलांनी बाबूलाल रसाळ या सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यासाठी ते रसाळ याच्या शेतात काम करत होते. पैशांची परतफेड झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दुसरीकडे काम करायला सुरुवात केली. त्यामुळे चिडलेल्या रसाळने बदला घ्यायचं ठरवलं. त्यानं शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. आणि तिच्यावर आठ दिवस बलात्कार केला. रसाळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून तो सुरमापुरी गावचा माजी उपसरपंच आहे. त्याचा भाऊ सरपंच आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि नारायण काळे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पण बाबूलाल आणि आणखी दोन जण फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close