S M L

जपानमध्ये किरणोत्सर्गाचा धोका वाढला

12 एप्रिलजपानमधील अणुसंकट आणखीनच भीषण होत चाललंय. जपानमधील किरणोर्त्सगाची पातळी वाढली आणि आता ही पातळी 7 पर्यंत पोहचली आहे. हा आतापर्यंतच उच्चांक आहे. त्यामुळे आता जपानमधील परिस्थिती 1986 च्या चेर्नोबिल दुर्घटनेइतकीच गंभीर बनली आहे. रिऍक्टर्समधील प्रक्रिया अजूनही तंत्रज्ञांच्या संपूर्ण नियंत्रणात आलेल्या नाहीत. जपानमधील भूकंप आणि सुनामीला एक महिना उलटला आहे. मृतांचा आकडा 13 हजारांवर तर बेपत्ता लोकांचा आकडा 14 हजारांवर पोहचला. दरम्यान वाढता किरणोत्सर्ग लक्षात घेत जपान सरकारने फुकुशिमा दायची प्रकल्पाच्या आसपासच्या आणखी काही शहरांमधील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 09:48 AM IST

जपानमध्ये किरणोत्सर्गाचा धोका वाढला

12 एप्रिल

जपानमधील अणुसंकट आणखीनच भीषण होत चाललंय. जपानमधील किरणोर्त्सगाची पातळी वाढली आणि आता ही पातळी 7 पर्यंत पोहचली आहे. हा आतापर्यंतच उच्चांक आहे. त्यामुळे आता जपानमधील परिस्थिती 1986 च्या चेर्नोबिल दुर्घटनेइतकीच गंभीर बनली आहे. रिऍक्टर्समधील प्रक्रिया अजूनही तंत्रज्ञांच्या संपूर्ण नियंत्रणात आलेल्या नाहीत. जपानमधील भूकंप आणि सुनामीला एक महिना उलटला आहे. मृतांचा आकडा 13 हजारांवर तर बेपत्ता लोकांचा आकडा 14 हजारांवर पोहचला. दरम्यान वाढता किरणोत्सर्ग लक्षात घेत जपान सरकारने फुकुशिमा दायची प्रकल्पाच्या आसपासच्या आणखी काही शहरांमधील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close