S M L

घरात 7 महिने बंद असलेल्या बहिनींची सुटका

12 एप्रिलदिल्ली येथील नोएडामध्ये गेले 7 महिने घरात बंद असलेल्या दोन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलींंची सुटका केली. या मुलींची अवस्था अतिशय वाईट होती. उपासमार आणि डिहायड्रेशनमुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडायचा प्रयत्न केला. त्यावेळी या मुलींनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी घरात जाऊन एका मुलीला स्ट्रेचरवरून बाहेर आणलं. हे घर एका रिटार्यड कर्नलचे असल्याचे रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशननं सांगितलं आहे. या कर्नलचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या मागे 2 मुली आणि एक मुलगा आहे. सध्या हा मुलगा कुठे आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 12:48 PM IST

घरात 7 महिने बंद असलेल्या बहिनींची सुटका

12 एप्रिल

दिल्ली येथील नोएडामध्ये गेले 7 महिने घरात बंद असलेल्या दोन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलींंची सुटका केली. या मुलींची अवस्था अतिशय वाईट होती. उपासमार आणि डिहायड्रेशनमुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडायचा प्रयत्न केला. त्यावेळी या मुलींनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी घरात जाऊन एका मुलीला स्ट्रेचरवरून बाहेर आणलं. हे घर एका रिटार्यड कर्नलचे असल्याचे रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशननं सांगितलं आहे. या कर्नलचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या मागे 2 मुली आणि एक मुलगा आहे. सध्या हा मुलगा कुठे आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close