S M L

आठ आरोपींची निर्दोष सुटका

13 एप्रिलमुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई नगर प्रकरणातील दंगलीचा आरोप असणार्‍या सगळ्या आरोपींची कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे. शिवडी सेशन कोर्टाने हानिर्णय दिला आहे. रमाबाई नगरमध्ये राहणार्‍या 11 जणांवर दंगलीचा आरोप होता. गोळीबारात हे सगळे 11 जण जखमी झाले होते. त्या सर्वांवर दंगल भडकावण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यापैकी तिघांचा नंतर मृत्यू झाला. इतर 8 आरोपींवर गेल्या सहा वर्षांपासून खटला चालवण्यात येत होता. आज शिवडी कोर्टाने त्याच केसच्या सुनावणी दरम्यान या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या या गोळीबारात दहाजण जागीच ठार झाले होते. तर या प्रकरणी एसआरपीच्या मनोहर कदमला याआधी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहेत.मुंबईत 11 जुलै 1997 सालात झालेल्या रमाबाई नगर येथील गोळीबार प्रकरणात जे जखमी झाले होते. या गोळीबारातील जखमींवर दंगल भडकवल्या प्रकरणी आरोपी करण्यात आलंय. हा खटला गेल्या काही वर्षापासून शिवडी येथील विशेष सेशन कोर्टात सुरु होता आज अखेर या प्रकरणाचा निर्णय लागला आहे. मात्र त्यापैकी तीन जण मृत पावले आहेत . सुदेवी रामचंद्र गिरी, बापू ज्ञानदेव कोळेकर, हिरामन सदाशिव गायकवाड, विजय विश्वनाथ गायकवाड, रामचंद्र अण्णा कदम, राम सज्जन हिरे, संजय सुखदेव अहिरे, रघुनाथ जयराम जाधव हे सर्व आरोपी गोळीबारात जखमी झाले होते. खटला सुरू असताना कित्येक दिवस हॉस्पिटल मध्ये होते. यानंतर त्यांना कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहेत. या जखमींवर भा.द.वि 307 , 427 , 425, 332 , 336, त्याच प्रमाणे मुंबई पोलीस अँक्टची 143 ते 149 ही कलम लावण्यात आली आहे. 2005 सालात त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलं. गेल्या सहा वर्षापासून खटला सुरु होता. या प्रकरणात मनोहर कदम यांच्या सह चार जण साक्षीदार आहेत. हा खटला शिवडी येथील न्यायमूर्ती नितिन दळवी यांच्या कोर्टात सुरु होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2011 09:31 AM IST

आठ आरोपींची निर्दोष सुटका

13 एप्रिल

मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई नगर प्रकरणातील दंगलीचा आरोप असणार्‍या सगळ्या आरोपींची कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे. शिवडी सेशन कोर्टाने हानिर्णय दिला आहे. रमाबाई नगरमध्ये राहणार्‍या 11 जणांवर दंगलीचा आरोप होता. गोळीबारात हे सगळे 11 जण जखमी झाले होते. त्या सर्वांवर दंगल भडकावण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

त्यापैकी तिघांचा नंतर मृत्यू झाला. इतर 8 आरोपींवर गेल्या सहा वर्षांपासून खटला चालवण्यात येत होता. आज शिवडी कोर्टाने त्याच केसच्या सुनावणी दरम्यान या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या या गोळीबारात दहाजण जागीच ठार झाले होते. तर या प्रकरणी एसआरपीच्या मनोहर कदमला याआधी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहेत.

मुंबईत 11 जुलै 1997 सालात झालेल्या रमाबाई नगर येथील गोळीबार प्रकरणात जे जखमी झाले होते. या गोळीबारातील जखमींवर दंगल भडकवल्या प्रकरणी आरोपी करण्यात आलंय. हा खटला गेल्या काही वर्षापासून शिवडी येथील विशेष सेशन कोर्टात सुरु होता आज अखेर या प्रकरणाचा निर्णय लागला आहे.

मात्र त्यापैकी तीन जण मृत पावले आहेत . सुदेवी रामचंद्र गिरी, बापू ज्ञानदेव कोळेकर, हिरामन सदाशिव गायकवाड, विजय विश्वनाथ गायकवाड, रामचंद्र अण्णा कदम, राम सज्जन हिरे, संजय सुखदेव अहिरे, रघुनाथ जयराम जाधव हे सर्व आरोपी गोळीबारात जखमी झाले होते. खटला सुरू असताना कित्येक दिवस हॉस्पिटल मध्ये होते.

यानंतर त्यांना कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहेत. या जखमींवर भा.द.वि 307 , 427 , 425, 332 , 336, त्याच प्रमाणे मुंबई पोलीस अँक्टची 143 ते 149 ही कलम लावण्यात आली आहे. 2005 सालात त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलं. गेल्या सहा वर्षापासून खटला सुरु होता. या प्रकरणात मनोहर कदम यांच्या सह चार जण साक्षीदार आहेत. हा खटला शिवडी येथील न्यायमूर्ती नितिन दळवी यांच्या कोर्टात सुरु होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2011 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close