S M L

विहीरीसाठी आयुष्याचं पाणी ; शेतकर्‍यांचे मारेकरी कोण ?

12 एप्रिलअलका धुपकर, मुंबईविदर्भात सतत होणारा अवकाळी पाऊस आणि कपाशीच्या पिकाची आलेली नापिकी यापुढे शेतकर्‍यांनी हात टेकले. कपाशीला पर्याय असलेला सोयाबीन पेरला तर त्याचे बाजारभाव पाडले जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची तातडीची मदत सरकारनं जाहीर केली. पण प्रत्यक्षात शेतकर्‍याची आत्महत्याच या मदतीसाठी अपात्र ठरवून शेतकर्‍यांच्या कुटुंबाला नागवलं जातंय. कर्त्या माणसाच्या आत्महत्येनंतर कुटुंबाची ही मदत मिळवण्यासाठी फरफट होतेय. तुळशीराम पवार या 60 वर्षाच्या शेतकर्‍याने आपल्या वावरात म्हणजे शेतातच कीटकनाशक घेतलं. तुळशीराम आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा संसार या चार एकराच्या शेतीवरच चालायचा. तुळशीराम आणि जिजाबाईने आयुष्यभर शेतात राबून संसाराचा गाडा चालवला होता. पण जिजाबाईच्या संसाराचे चाक मध्येच निखळून पडलंय. आणि उरलंय तिचं अर्धांग झालेलं शरीर आणि कर्जाचा बोजा.तर यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील शिवणी गावची ही गोष्ट. सिंचनाची गैरसोय आणि शेतीवर गुजराण करणारे कास्तकरी. झाकपाक पोशाखातून जशी श्रीमंती चमकून उठते. तसेच इथली गरिबीही खूप काही सांगते. धान्याच्या पोत्यांऐवजी घर जनावरांच्या मक्याच्या कोंड्यांने भरलेलं असतं. मेहनत करुनही पिचलेलं आयुष्य जगणारे हे संसार बघितले की सुन्न व्हायला होतं.या शेतकर्‍यांना चैनीचे आयुष्य तर जगता येतच नाही. पण औषधपाण्याचा खर्च, मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च, शेतीत बोअर मारण्यासाठीचा खर्चही परवडत नाही.पिपली लाईव्हमध्ये दाखवलेली मंहगांई खरोखरच गावागावातली डायन बनली आहे. पांढरकवड्याच्या एका बंजारा तांड्यावर म्हणूनच हे शेतकरी जमतात. सरकारच्या निषेधाची भजनं गातात. त्याचे सूर सरकारपर्यंत पोचतील या भाबड्या आशेने.विहीरीसाठी..आयुष्याचं पाणी विदर्भात आत्महत्येचं सत्र सुरु झालं होतं तेव्हा म्हणजे 2006 मध्ये वर्धा जिल्ह्यातल्या मोशी गावातल्या विलास मडवी या तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केली. त्यानंतर मीराला विलासच्या बायकोला मजुरी करावी लागतेय. स्वत:ची शेती कसायला घरचा माणूसच उरला नाही म्हणून शेती दुसर्‍याला मक्त्याने करायला दिली. पंतप्रधान पॅकेजमध्ये तिला विहीर मंजूर झाली. पण या विहीरीच्या सुरवातीच्या बांधकामाचा 30 हजाराचा खर्च तिने करायचा आहे. तरच तिला पॅकेजचा लाभ मिळेल. दिवसाला मिळणार्‍या 50 रुपयाच्या मजुरीत मीरा कसतरी घरं चालवते. दोन मुलं, आजारी सासू पॅकेज मिळूच द्यायचं नाही, म्हणून अशा अटी घातल्यायत का? असंच ती सरकारला विचारते.यवतमाळ जिल्ह्यातल्या दहेली तांड्यावर राहणार्‍या आठ शेतकर्‍यांचा हाच प्रश्न आहे. खोदलेल्या विहीरी, कर्ज काढून केलेली बांधकामं आणि तालुका प्रशासनाकडे प्रलंबित असलेला सिंचन जलपूर्ती धडक योजनेचा निधी एक लाख 10 हजार रुपयांचा निधी मिळवण्यासाठीही शेतकर्‍याला वणवण करावी लागतेय.पंतप्रधान पॅकेजची भूल देऊन सरकारने शेतकर्‍यांना कर्जबाजारी केलंय. सिंचन जलपूर्ती धडक योजनेचा विदर्भातला बोजवारा हे त्याचं या महाघोटाळ्यातील एक प्रातिनीधिक उदाहरण.आत्महत्या मात्र सुरूच2004 ते 2011 साली 7,974 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2004 साली 456 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2005 साली 666 शेतकर्‍यांच्या आत्महत्या ( पॅकेज जाहीर - 1,075 कोटी (राज्य))2006साली 1866 शेतकर्‍यांच्या आत्महत्या - पॅकेज जाहीर - 3,750 कोटी (केंद्र)2007 साली 1556 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2008 साली 1680 शेतकर्‍यांच्या आत्महत्या -पॅकेज जाहीर - 71,000 कोटी (केंद्र), पॅकेज जाहीर - 1,088 कोटी (राज्य)2009 साली 916 शेतकर्‍यांच्या आत्महत्या2010 साली 706 शेतकर्‍यांच्या आत्महत्या2011साली 128 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2011 05:56 PM IST

विहीरीसाठी आयुष्याचं पाणी ; शेतकर्‍यांचे मारेकरी कोण ?

12 एप्रिल

अलका धुपकर, मुंबई

विदर्भात सतत होणारा अवकाळी पाऊस आणि कपाशीच्या पिकाची आलेली नापिकी यापुढे शेतकर्‍यांनी हात टेकले. कपाशीला पर्याय असलेला सोयाबीन पेरला तर त्याचे बाजारभाव पाडले जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची तातडीची मदत सरकारनं जाहीर केली. पण प्रत्यक्षात शेतकर्‍याची आत्महत्याच या मदतीसाठी अपात्र ठरवून शेतकर्‍यांच्या कुटुंबाला नागवलं जातंय. कर्त्या माणसाच्या आत्महत्येनंतर कुटुंबाची ही मदत मिळवण्यासाठी फरफट होतेय.

तुळशीराम पवार या 60 वर्षाच्या शेतकर्‍याने आपल्या वावरात म्हणजे शेतातच कीटकनाशक घेतलं. तुळशीराम आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा संसार या चार एकराच्या शेतीवरच चालायचा. तुळशीराम आणि जिजाबाईने आयुष्यभर शेतात राबून संसाराचा गाडा चालवला होता. पण जिजाबाईच्या संसाराचे चाक मध्येच निखळून पडलंय. आणि उरलंय तिचं अर्धांग झालेलं शरीर आणि कर्जाचा बोजा.

तर यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील शिवणी गावची ही गोष्ट. सिंचनाची गैरसोय आणि शेतीवर गुजराण करणारे कास्तकरी. झाकपाक पोशाखातून जशी श्रीमंती चमकून उठते. तसेच इथली गरिबीही खूप काही सांगते. धान्याच्या पोत्यांऐवजी घर जनावरांच्या मक्याच्या कोंड्यांने भरलेलं असतं. मेहनत करुनही पिचलेलं आयुष्य जगणारे हे संसार बघितले की सुन्न व्हायला होतं.

या शेतकर्‍यांना चैनीचे आयुष्य तर जगता येतच नाही. पण औषधपाण्याचा खर्च, मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च, शेतीत बोअर मारण्यासाठीचा खर्चही परवडत नाही.पिपली लाईव्हमध्ये दाखवलेली मंहगांई खरोखरच गावागावातली डायन बनली आहे. पांढरकवड्याच्या एका बंजारा तांड्यावर म्हणूनच हे शेतकरी जमतात. सरकारच्या निषेधाची भजनं गातात. त्याचे सूर सरकारपर्यंत पोचतील या भाबड्या आशेने.विहीरीसाठी..आयुष्याचं पाणी

विदर्भात आत्महत्येचं सत्र सुरु झालं होतं तेव्हा म्हणजे 2006 मध्ये वर्धा जिल्ह्यातल्या मोशी गावातल्या विलास मडवी या तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केली. त्यानंतर मीराला विलासच्या बायकोला मजुरी करावी लागतेय. स्वत:ची शेती कसायला घरचा माणूसच उरला नाही म्हणून शेती दुसर्‍याला मक्त्याने करायला दिली.

पंतप्रधान पॅकेजमध्ये तिला विहीर मंजूर झाली. पण या विहीरीच्या सुरवातीच्या बांधकामाचा 30 हजाराचा खर्च तिने करायचा आहे. तरच तिला पॅकेजचा लाभ मिळेल. दिवसाला मिळणार्‍या 50 रुपयाच्या मजुरीत मीरा कसतरी घरं चालवते. दोन मुलं, आजारी सासू पॅकेज मिळूच द्यायचं नाही, म्हणून अशा अटी घातल्यायत का? असंच ती सरकारला विचारते.

यवतमाळ जिल्ह्यातल्या दहेली तांड्यावर राहणार्‍या आठ शेतकर्‍यांचा हाच प्रश्न आहे. खोदलेल्या विहीरी, कर्ज काढून केलेली बांधकामं आणि तालुका प्रशासनाकडे प्रलंबित असलेला सिंचन जलपूर्ती धडक योजनेचा निधी एक लाख 10 हजार रुपयांचा निधी मिळवण्यासाठीही शेतकर्‍याला वणवण करावी लागतेय.

पंतप्रधान पॅकेजची भूल देऊन सरकारने शेतकर्‍यांना कर्जबाजारी केलंय. सिंचन जलपूर्ती धडक योजनेचा विदर्भातला बोजवारा हे त्याचं या महाघोटाळ्यातील एक प्रातिनीधिक उदाहरण.

आत्महत्या मात्र सुरूच

2004 ते 2011 साली 7,974 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2004 साली 456 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2005 साली 666 शेतकर्‍यांच्या आत्महत्या ( पॅकेज जाहीर - 1,075 कोटी (राज्य))2006साली 1866 शेतकर्‍यांच्या आत्महत्या - पॅकेज जाहीर - 3,750 कोटी (केंद्र)2007 साली 1556 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2008 साली 1680 शेतकर्‍यांच्या आत्महत्या -पॅकेज जाहीर - 71,000 कोटी (केंद्र), पॅकेज जाहीर - 1,088 कोटी (राज्य)2009 साली 916 शेतकर्‍यांच्या आत्महत्या2010 साली 706 शेतकर्‍यांच्या आत्महत्या2011साली 128 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2011 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close