S M L

महालक्ष्मी मंदिरात मनसेच्या महिलांनी केला गाभार्‍यात प्रवेश

14 एप्रिलमनसेचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश केला. मंदिरातील पुजार्‍यांनी नरमाईची भुमिका घेत आमदार राम कदम यांना मोजक्या महिलांना घेवून यावं त्याचबरोबर आपणही सोवळं नेसून मंदिर गाभार्‍यात प्रवेश करावा असं अवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत राम कदम यांनी सोवळं नेसून महिलांना घेऊन गाभार्‍यात प्रवेश केला. यावेळी महिलांनी देवीला साडी नेसवून ओटी भरली. दरम्यान, मनसेच्या महिलांनी देवीची ओटी भरल्यानंतर आनंद उत्सव साजरा केला. आमदार राम कदम यांनी मंदिर परिसरात लाडू वाटले. त्याचबरोबर मंदिर विकासाठी सरकारने 500 कोटी रुपये द्यावेत अशी मागणीही राम कदम यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 09:57 AM IST

महालक्ष्मी मंदिरात मनसेच्या महिलांनी केला गाभार्‍यात प्रवेश

14 एप्रिल

मनसेचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश केला. मंदिरातील पुजार्‍यांनी नरमाईची भुमिका घेत आमदार राम कदम यांना मोजक्या महिलांना घेवून यावं त्याचबरोबर आपणही सोवळं नेसून मंदिर गाभार्‍यात प्रवेश करावा असं अवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत राम कदम यांनी सोवळं नेसून महिलांना घेऊन गाभार्‍यात प्रवेश केला. यावेळी महिलांनी देवीला साडी नेसवून ओटी भरली. दरम्यान, मनसेच्या महिलांनी देवीची ओटी भरल्यानंतर आनंद उत्सव साजरा केला. आमदार राम कदम यांनी मंदिर परिसरात लाडू वाटले. त्याचबरोबर मंदिर विकासाठी सरकारने 500 कोटी रुपये द्यावेत अशी मागणीही राम कदम यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close