S M L

जीव थकला पण बाबांचं गाणं लिहणारच !

अखिलेश गणवीर, नागपूर14 एप्रिलनागपूर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांती चळवळीचं ठिकाण. समाजापासून उपेक्षित राहिलेल्या दिनदलित बांधवांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला तो बाबासाहेबांनी. त्यामुळे बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन बी. काशीनंद आजही वयाच्या 75 व्या वर्षीसुद्धा बाबासाहेबांवर गाणं लिहून समाजप्रबोधनाचं काम करीत आहे. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी आजही आंबेडकरी जनतेच्या ओठावर रूजली आहेत. बी. काशीनंद वयाच्या 75 व्या वर्षी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आजही आपल्या थरथरत्या हाताने गाणं लिहित असतात. मनात मात्र बाबासाहेबांचे प्रकाशपर्व सांगण्याची जिद्द आहे. आपल्या गाण्यातून बाबासाहेबांच्या वेदना सांगताना त्यांना गहिवरून येतं.नागपूरच्या पांढराबोडीतल्या पडक्या घराच्या एका खोलीत राहून काशीनंद यांनी त्यांच्या गीतांमधून आंबेडकरी चळवळ लोकांपर्यंत पोहचवली. संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या जीवनावर गाणं लिहिणारे काशीनंद यांचे हात आता थकले आहेत. पण समाजापासून मात्र ते कायमच दुर्लक्षित राहिले. बाबासाहेबांच्या चळवळीवर गाणं लिहिताना काशीनंद यांचे हात जरी थरथरत असले तरी, बाबासाहेबांची प्रेरणा अजूनही त्यांच्या मनात कायम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 10:20 AM IST

जीव थकला पण बाबांचं गाणं लिहणारच !

अखिलेश गणवीर, नागपूर

14 एप्रिल

नागपूर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांती चळवळीचं ठिकाण. समाजापासून उपेक्षित राहिलेल्या दिनदलित बांधवांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला तो बाबासाहेबांनी. त्यामुळे बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन बी. काशीनंद आजही वयाच्या 75 व्या वर्षीसुद्धा बाबासाहेबांवर गाणं लिहून समाजप्रबोधनाचं काम करीत आहे. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी आजही आंबेडकरी जनतेच्या ओठावर रूजली आहेत.

बी. काशीनंद वयाच्या 75 व्या वर्षी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आजही आपल्या थरथरत्या हाताने गाणं लिहित असतात. मनात मात्र बाबासाहेबांचे प्रकाशपर्व सांगण्याची जिद्द आहे. आपल्या गाण्यातून बाबासाहेबांच्या वेदना सांगताना त्यांना गहिवरून येतं.नागपूरच्या पांढराबोडीतल्या पडक्या घराच्या एका खोलीत राहून काशीनंद यांनी त्यांच्या गीतांमधून आंबेडकरी चळवळ लोकांपर्यंत पोहचवली.

संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या जीवनावर गाणं लिहिणारे काशीनंद यांचे हात आता थकले आहेत. पण समाजापासून मात्र ते कायमच दुर्लक्षित राहिले. बाबासाहेबांच्या चळवळीवर गाणं लिहिताना काशीनंद यांचे हात जरी थरथरत असले तरी, बाबासाहेबांची प्रेरणा अजूनही त्यांच्या मनात कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close