S M L

बलवाशी संबंध नाही - पवार

14 एप्रिलटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी शरद पवार यांचे संबंध असल्याचा आरोप पुन्हा एकदा झाला आहे. कॉर्पेोरट लॉबिस्ट नीरा राडियांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात पवारांचं नाव घेतलं. पण शरद पवार यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहे. स्पेक्ट्रम घोटाळ्याशी किंवा डी. बी. रिऍल्टीशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. एकनाथ खडसेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना आता दुजोरा मिळाला आहे. कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांनीही पवारांचा संबंध टू जी स्पेक्ट्रम घोटाळयाशी असू शकतो, असा सनसनाटी आरोप केला आहे. डीबी रिऍल्टी या वादग्रस्त कंपनीचे निंयत्रण शरद पवारांकडे असू शकतं, असं नीरा राडियांनी सीबीआयसमोर दिलेल्या जबाबात म्हटलंय. डी बी रिऍल्टी ही कंपनी स्टेक्ट्रम घोटाळ्याची लाभार्थी असून या कंपनीचे मालक शाहीद बलवा आणि विनोद गोएंका यांच्या कुटुंबीयांशी पवारांचे संबंध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईमध्ये तसेच इतरत्रही असं मानलं जातं की, डीबी रिऍल्टीचं नियंत्रण अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे आहे. शाहीद बलवा आणि विनोद गोएंका हे डीबी रिऍल्टीमधले लोक पवारांच्या जवळचे आहेत. शाहीद बलवा आणि विनोद गोएंका हे स्पेक्ट्रम घोाळ्यातील महत्त्वाचे आरोपी आहेत आणि सध्या त्यांची रवानगी तुरुंगात झाली आहे. त्यांच्याशी पवारांचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनीही केला होता. पण शरद पवारांनी या सगळ्या आरोपाचे खंडन केलं आहे. नीरा राडियांकडे पवार डीबी रिऍल्टीचे मालक असल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही स्पेक्ट्रम घोटाळ्याशी वारंवार पवार कुटुंबीयांचं नाव जोडलं जातंय हे वास्तव आहे. म्हणून पवार कनेक्शनची सुद्धा सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. दरम्यान, पवारांविषयीचा जबाब हा संदर्भासह दिला गेलेला नाही असं नीरा राडियांचं म्हणणं आहे आणि आमचे शत्रू गोष्टी पेरतायत असंही त्यांनी म्हटलं आहे. नीरा राडियाची माहिती- डीबी रियाल्टीची मालकी शरद पवारांकडे असण्याची शक्यता- 2 जी स्पेक्ट्रमचं लायसन मिळवण्यासाठी- स्वान कंपनीला पवारांनी मदत केल्याची शक्यता - पण आपल्याकडे याबाबत पुरावा नाहीनीरा राडिया यांनी उद्योजक अनिल अंबानींविषयीही सीबीआयला काही माहिती दिली आहे.राडियांचे अनिल अंबानींवर आरोप- अनिल अंबानींच्या रिलायन्सचं स्वान टेलिकॉमवर नियंत्रण- अंबानी राजा आणि काही पत्रकारांच्या जवळचे - राडियांच्या मते आर कॉमला मदत करणे ही राजांची चूक- राजांचे सहकारी चंडोलिया यांच्या राडिया जवळच्या हे माहितीत स्पष्ट- राजांना दूरसंचार मंत्रालयात अजिबात रस नव्हता.- राजांना मंत्रीपद द्यावे यासाठी द्रमुकच्या खासदार कन्निमोळी यांच्याशी आपण कधीही संपर्क केला नाहीघोटाळ्याशी माझा संबंध नाही - रतन टाटा2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी माझा काडीचाही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सीएनएनला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. गैरमार्गाने गेलो असतो. तर याहूनही जास्त प्रगती करू शकलो असतो. पण मी कधीही तसं केलं नाही असंही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 05:24 PM IST

बलवाशी संबंध नाही - पवार

14 एप्रिल

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी शरद पवार यांचे संबंध असल्याचा आरोप पुन्हा एकदा झाला आहे. कॉर्पेोरट लॉबिस्ट नीरा राडियांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात पवारांचं नाव घेतलं. पण शरद पवार यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहे. स्पेक्ट्रम घोटाळ्याशी किंवा डी. बी. रिऍल्टीशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.

एकनाथ खडसेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना आता दुजोरा मिळाला आहे. कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांनीही पवारांचा संबंध टू जी स्पेक्ट्रम घोटाळयाशी असू शकतो, असा सनसनाटी आरोप केला आहे. डीबी रिऍल्टी या वादग्रस्त कंपनीचे निंयत्रण शरद पवारांकडे असू शकतं, असं नीरा राडियांनी सीबीआयसमोर दिलेल्या जबाबात म्हटलंय. डी बी रिऍल्टी ही कंपनी स्टेक्ट्रम घोटाळ्याची लाभार्थी असून या कंपनीचे मालक शाहीद बलवा आणि विनोद गोएंका यांच्या कुटुंबीयांशी पवारांचे संबंध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.

मुंबईमध्ये तसेच इतरत्रही असं मानलं जातं की, डीबी रिऍल्टीचं नियंत्रण अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे आहे. शाहीद बलवा आणि विनोद गोएंका हे डीबी रिऍल्टीमधले लोक पवारांच्या जवळचे आहेत. शाहीद बलवा आणि विनोद गोएंका हे स्पेक्ट्रम घोाळ्यातील महत्त्वाचे आरोपी आहेत आणि सध्या त्यांची रवानगी तुरुंगात झाली आहे. त्यांच्याशी पवारांचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनीही केला होता. पण शरद पवारांनी या सगळ्या आरोपाचे खंडन केलं आहे.

नीरा राडियांकडे पवार डीबी रिऍल्टीचे मालक असल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही स्पेक्ट्रम घोटाळ्याशी वारंवार पवार कुटुंबीयांचं नाव जोडलं जातंय हे वास्तव आहे. म्हणून पवार कनेक्शनची सुद्धा सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. दरम्यान, पवारांविषयीचा जबाब हा संदर्भासह दिला गेलेला नाही असं नीरा राडियांचं म्हणणं आहे आणि आमचे शत्रू गोष्टी पेरतायत असंही त्यांनी म्हटलं आहे.

नीरा राडियाची माहिती

- डीबी रियाल्टीची मालकी शरद पवारांकडे असण्याची शक्यता- 2 जी स्पेक्ट्रमचं लायसन मिळवण्यासाठी- स्वान कंपनीला पवारांनी मदत केल्याची शक्यता - पण आपल्याकडे याबाबत पुरावा नाही

नीरा राडिया यांनी उद्योजक अनिल अंबानींविषयीही सीबीआयला काही माहिती दिली आहे.

राडियांचे अनिल अंबानींवर आरोप

- अनिल अंबानींच्या रिलायन्सचं स्वान टेलिकॉमवर नियंत्रण- अंबानी राजा आणि काही पत्रकारांच्या जवळचे - राडियांच्या मते आर कॉमला मदत करणे ही राजांची चूक- राजांचे सहकारी चंडोलिया यांच्या राडिया जवळच्या हे माहितीत स्पष्ट- राजांना दूरसंचार मंत्रालयात अजिबात रस नव्हता.- राजांना मंत्रीपद द्यावे यासाठी द्रमुकच्या खासदार कन्निमोळी यांच्याशी आपण कधीही संपर्क केला नाही

घोटाळ्याशी माझा संबंध नाही - रतन टाटा

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी माझा काडीचाही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सीएनएनला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. गैरमार्गाने गेलो असतो. तर याहूनही जास्त प्रगती करू शकलो असतो. पण मी कधीही तसं केलं नाही असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close