S M L

भिवंडीजवळ पाईपलाईनचं काम सुरू ; 30 टक्के पाणी कपात

15 एप्रिलमुंबईमध्ये काल गुरूवारी भिवंडीजवळ मुंबईला पाणीपुवठा कऱणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे आज शहरात तीस टक्के पाणीकपात करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपुन वापरण्याच आवाहन महापालिकेनं केलं आहे. काल मध्यरात्रीपासून मुंबई पालिकेचे 70 ते 80 कामगार आणि अधिकारी पाईपलाईन दुरुस्तीचं काम करत आहे. पूर्व आणि पश्चिम भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामात थोडा उशीर होतोय. दरम्यान टेमगर भागातील पाईपलाईनचा वॉल्व ओपन केल्यामुळे अजूनही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संध्याकाळपर्यंत पाईपलाईन दुरस्त होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 09:52 AM IST

भिवंडीजवळ पाईपलाईनचं काम सुरू ; 30 टक्के पाणी कपात

15 एप्रिल

मुंबईमध्ये काल गुरूवारी भिवंडीजवळ मुंबईला पाणीपुवठा कऱणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे आज शहरात तीस टक्के पाणीकपात करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपुन वापरण्याच आवाहन महापालिकेनं केलं आहे. काल मध्यरात्रीपासून मुंबई पालिकेचे 70 ते 80 कामगार आणि अधिकारी पाईपलाईन दुरुस्तीचं काम करत आहे. पूर्व आणि पश्चिम भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामात थोडा उशीर होतोय. दरम्यान टेमगर भागातील पाईपलाईनचा वॉल्व ओपन केल्यामुळे अजूनही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संध्याकाळपर्यंत पाईपलाईन दुरस्त होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close