S M L

आंदोलकांनी पोलीस निरीक्षकाला कोंडून ठेवलं

15 एप्रिलनाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये सेझ विरोधी आंदोलनाचा आज भडका उडाला. राज्य सरकारने दिलेल्या अटी पाळल्या नाहीत असा आरोप करत शेतकर्‍यांनी कंपनीचं काम बंद पाडलं. तसेच संतप्त आंदोलक शेतकर्‍यांनी यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षकालाही कोंडून ठेवलं. इतकंच नाही तर पोलीस निरीक्षकाकडून जबरदस्तीने गावकर्‍यांनी स्टेटमेंट वदवून घेतलं. जमावाच्या या दबावापुढे नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनाही नमतं घ्यावं लागलं एवढी गावकर्‍यांची दादागिरी होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 11:02 AM IST

आंदोलकांनी पोलीस निरीक्षकाला कोंडून ठेवलं

15 एप्रिल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये सेझ विरोधी आंदोलनाचा आज भडका उडाला. राज्य सरकारने दिलेल्या अटी पाळल्या नाहीत असा आरोप करत शेतकर्‍यांनी कंपनीचं काम बंद पाडलं. तसेच संतप्त आंदोलक शेतकर्‍यांनी यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षकालाही कोंडून ठेवलं. इतकंच नाही तर पोलीस निरीक्षकाकडून जबरदस्तीने गावकर्‍यांनी स्टेटमेंट वदवून घेतलं. जमावाच्या या दबावापुढे नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनाही नमतं घ्यावं लागलं एवढी गावकर्‍यांची दादागिरी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close