S M L

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल

15 एप्रिलमालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एनआयएनं गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याबाबतची सुनावणी विशेष मोक्का कोर्टाचे न्यायाधीश वाय.डी. शिंदे यांच्या न्यायालयात व्हावी असा विनंती अर्ज विशेष सरकारी वकिल रोहिणी सालियन यांनी केला आहे. मालेगाव इथं 2006 मध्ये बडीरातच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. यावेळी अनेकजण ठार झाले होते. तसेच शेकडो लोक जखमी झाले होते. काही दिवसांपूर्वी स्वामी असीमानंद यांनी मालेगाव येथील बॉम्बस्फोट हिंदूत्ववादी संघटनाने केल्याचा कबुली जबाब दिला होता. असीमानंद यांना ज्या प्रकरणात अटक झाली त्या प्रकरणाचा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तपास करत असल्याने मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपासदेखील एनआयएकडे सोपवण्यात आला. याबाबत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं नुकताचं गुन्हा दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 01:13 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल

15 एप्रिल

मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एनआयएनं गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याबाबतची सुनावणी विशेष मोक्का कोर्टाचे न्यायाधीश वाय.डी. शिंदे यांच्या न्यायालयात व्हावी असा विनंती अर्ज विशेष सरकारी वकिल रोहिणी सालियन यांनी केला आहे. मालेगाव इथं 2006 मध्ये बडीरातच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. यावेळी अनेकजण ठार झाले होते.

तसेच शेकडो लोक जखमी झाले होते. काही दिवसांपूर्वी स्वामी असीमानंद यांनी मालेगाव येथील बॉम्बस्फोट हिंदूत्ववादी संघटनाने केल्याचा कबुली जबाब दिला होता. असीमानंद यांना ज्या प्रकरणात अटक झाली त्या प्रकरणाचा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तपास करत असल्याने मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपासदेखील एनआयएकडे सोपवण्यात आला. याबाबत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं नुकताचं गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close