S M L

पुण्यात रस्त्यांच्या अर्धवट कामाविरोधात मनसेचं आंदोलन

15 एप्रिलपुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरातील चौकात होत असलेल्या भुयारी मार्गाचे काम हे 6 महीन्यांपासून रखडलं आहे. तसेच कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची कामही अर्धवट अवस्थेत असल्याने मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं. कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीचा परिसर गजबजलेला असतो. वाहतुकीची वर्दळही इथं मोठ्या प्रमाणावर असते. मनसेनं महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध केला आहे. तसेच लवकर काम पूर्ण केलं नाही तर महापालिकेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या परिसरातल्या नागरिकांनीही अर्धवट कामाबद्दल चीड व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 03:10 PM IST

पुण्यात रस्त्यांच्या अर्धवट कामाविरोधात मनसेचं आंदोलन

15 एप्रिल

पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरातील चौकात होत असलेल्या भुयारी मार्गाचे काम हे 6 महीन्यांपासून रखडलं आहे. तसेच कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची कामही अर्धवट अवस्थेत असल्याने मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं. कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीचा परिसर गजबजलेला असतो. वाहतुकीची वर्दळही इथं मोठ्या प्रमाणावर असते. मनसेनं महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध केला आहे. तसेच लवकर काम पूर्ण केलं नाही तर महापालिकेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या परिसरातल्या नागरिकांनीही अर्धवट कामाबद्दल चीड व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close